हिवाळ्यात आहारामध्ये या गोष्टींचा समावेश करा, आतून शरीर राहील टवटवीत आणि उबदार !:
आता पावसाळा संपला आहे आणि थंडीचे दिवस आले आहेत. थंडीच्या दिवसामध्ये आपल्या शरीराच्या काळजी घेणे अत्यंत महत्वाच आहे. अस मनल जात की हिवाळ्यामध्ये व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे आणि जितक व्यायाम करणे महत्वाचे आहे तितकेच त्याबरोबर हिवाळ्यात आहार घेणे पण खूप महत्वाचे आहे.
त्याचबरोबर हिवाळ्यातल्या थंडी पासून बचाव करण्यासाठी मऊ आणि उबदार कपडेच घालणेच आवश्यक नाही, तर त्याचसोबतच थंडीपासून आपले रक्षण करणाऱ्या गोष्टींचे सेवन करणे देखील तितकेच महत्वच आहे.
थंडी मध्ये म्हणजेच हिवाळ्यात सूर्याचा प्रकाश अत्यंत प्रमाणात कमी असल्यामुळे आणि त्याचबरोबर बाहेरच्या वातावरणात देखील खूप थंडावा किंवा गारवा असल्यामुळे खूप काही प्रकारच्या समस्या देखील होऊ शकतात जस की,खोकला येणे,अंगदुखी आणि त्याचबरोबर सर्दी होणे अशा काही समस्या होणे खूप प्रमाणात सामान्य आहे.
या थंडीच्या दिवसामध्ये तुमच्या आहारात गरम असलेल्या पदार्थांचा समावेश करणे अत्यंत गरजेच आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की गरम पदार्थांचा समावेश कशामुळे करायच. तर थंडीच्या दिवसामध्ये गरम पदार्थ तुमचे शरीर आतून उबदार ठेवण्यास खूप मदत करते.हे पदार्थ पोषक तत्वांनी समृद्ध असतात आणि त्यामुळे तुमची प्रतिकाशक्ती वाढण्यास देखील खुप मदत होते,व यामुळे तुम्ही थंडी मध्ये होण्याऱ्या आजारपासून खूप लांब राहाल.
मग मोसम कोणता पण असो,आपला आहार चांगला असेल तर आपल्याला निरोगी आणि स्वस्थ राहता येते. पण ऋतूचे वातावरणं किंवा तापमान डोक्यात ठेऊन थंड किंवा गरम गोष्टींचा आहारात समावेश करणे अत्यंत गरजेच आहे.
चला तर मग पाहूया की,असे कोणते कोणते पदार्थ आहेत जे की तुम्हाला हिवाळ्यात टवटवीत आणि उबदार राहण्यास मदत करते.
1.आपल्या आहारात या हिरव्या पाले भाज्यांचा समावेश नक्की करा
तीनही ऋतूमध्ये हिरव्या पालेभाज्यांच सेवन करण आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्वाच असते. कारण हिरव्या पाले भाज्यां आपल्या शरीराला निरोगी आणि तंदरूस्त ठेवण्यास खूप मदत करते.पण हिवाळ्यात या ऋतू प्रमाणे पाले भाज्यां च सेवन करण करण खुप महत्वाच असत.
तर मग तुम्ही हिवाळ्यात मोहरीच्या हिरवे पान असलेल्या भाज्यांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता आणि त्याचबरोबर मेथी आणि चवळी यांचा देखील तुम्ही समावेश करू शकता.या भाज्या खायला पण खूप चवदार लागतात.
त्याचबरोबर या पालेभाज्या खाल्याने आपल्या शरीरामद्धे आतून उष्णता मिळते आणि आपल्या शरीरा मधल पोषणमूल्य वाढत आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे आपण निरोगी राहतो.
हिरव्या भाज्यां खान का गरजेच आहे कारण की हिरव्या पाले भाज्यां मध्ये तेलमसाल्यांचा खूप जास्त प्रमाणात वापर होत नाही आणि त्याचमुळे आपल्या फिटनेसच्या दृष्टीकोणसमोरून सुद्धा अत्यंत फायदेशीर ठरते.
या सर्व पालेभाज्या आहारात समाविष्ट केल्याने शरीराला उष्णता, पोषण, आणि ऊर्जा मिळते, तसेच रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते.
2. थंडीच्या दिवसामध्ये गुळाचे सेवन करा
गूळ हा आपल्या शरीसाठी अत्यंत गरजेच आहे. आणि जर थंडीच्या दिवसामध्ये आपण गूळ याचा समावेश आपल्या आहारामद्धे केला तर चांगल राहील. त्याचबरोबर आपले शरीर आतून चांगल ठेवण्यासाठी तुमच्या आहारामद्धे साखरे एवजी तुम्ही गुळाचा समावेश करू शकता.हे अत्यंत फायदेशीर ठरेल.
जर आपण आपल्या आहारामद्धे रोज थोडा थोडा गूळ खायला सुरुवात केली तर आपण सर्दी आणि खोकल्यापासून वाचून राहतो. त्याचबरोबर आपल्या पचन क्रियेला सुद्धा खूप फायदा होतो.गूळ खाल्याने दूसरा एक खूप महत्वाचा फायदा होते ते म्हणजे आपल्या शरीरामद्धे रक्त तयार होण्यास मदत्त मिळते.
गुळामद्धे व्हिटॅमिन C प्रमाण देखील पण थोड्या प्रमानात असते आणि व्हिटॅमिन C असल्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकार शक्ति पन खूप वाढते.गुळाचा चहा पिण्यामुळे वजन कमी होण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.
हे पण वाचा:- Tips For Weight Loss : केवळ 7 दिवसात सोप्या पद्धतीने वजन कमी करा !
3.अळशीच्या बियांचे सेवन करा.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या आहारात अळशीच्या बिया यांचा समावेश करू शकता अळशींच्या बिया आहारामध्ये घेतल्यास थंडीच्या दिवसांमध्ये खूप फायदा होईल.तर तुम्ही रोज या बिया थोड थोड भाजून अर्धा किंवा एक चमचा भाजून त्यांचे सेवन करण महत्वाच ठरते.
जर तुम्हाला या बिया खूप आवडत असतील तर तुम्ही या बियांचे लाडू करून रोज एक लाडू खाऊ शकता.आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे अळशींच्या बिया यांचा सेवन गरोदर महिलांनी करणे टाळा.
अळशीच्या बिया आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात त्या जरी खूप छोट्या आकाराच्या असल्या तरी आपल्या पोषण मूल्यांसाठी एक चांगल्या प्रकारचा खजिना आहे.अळशीच्या बिया यामध्ये फायबर,ओमेगा-3, प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंट खूप मुबलक प्रमाणात आढळतात.
आळशीच्या बिया यांचे आरोग्यांसाठी खूप फायदे आहेत जसं की पचन सुधारते,हृदयाचे आरोग्य सुधारते ,त्याचबरोबर वजन नियंत्रित सुद्धा करण्यासाठी मदत करते आणि त्वचा आणि केस यांना मजबूत व चमकदार ठेवते.
तर अळशीच्या बिया यांचे सेवन करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवायचे आहे ते म्हणजे अळशीच्या बियांचे सेवन करणे जरी खूप फायदेशीर असलं तरी गर्भवती महिलांनी अळशीच्या बिया सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे खूप महत्त्वाचे आहे.
अळशीच्या च्या बियांचा समावेश आपल्या रोजच्या आहारामध्ये केल्याने आपले आरोग्य चांगले राहते आणि आपले शरीर निरोगी बनते.
4.तिळाचा आहारात समावेश करा.
हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खूप लोक शरीराला आतून उष्णता किंवा उबदार ठेवण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये तिळाचे लाडू यांचा समावेश करतात किंवा सेवन करतात. तीळ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर देखील ठरते.
तुम्ही हे तीळ भाजून खाऊ शकता.तीळमध्ये खूप मुबलक प्रमाणामध्ये कॅल्शियम आढळते आणि हे कॅल्शियम प्रोटीनचा एक मात्र चांगला स्त्रोत आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना यूरिक ॲसिड ची समस्या आहे त्यांनी हे तीळ खूप मुबलक प्रमाणात म्हणजेच मर्यादित प्रमाणात खावे.तीळ भाजण्याऐवजी भिजून खाणे चांगलं असं मानलं जातं.
तिळाचा आहारामध्ये तुम्ही अशाप्रकारे समावेश करू शकता: तिळाचे तूप किंवा तिळाचे फोड आपल्या रोजच्या आहारामध्ये म्हणजेच भाज्या सूप किंवा पराठ्यात मिसळून खाऊ शकता. तिळाचे तिळगुळ आणि तिळाचे लाडू खाल्याने हिवाळ्यात तुम्हाला उष्णता सुद्धा मिळते.
तिळाची सेवन आपल्या आहारामध्ये केल्याने आपल्याला आवश्यक पोषण मिळते आणि त्याचे विविध प्रकारचे फायदे सुद्धा आपल्याला अनुभवता येतील.
5. सुका मेवा आणि नट्स याचा आहारात समावेश
थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही अंजीर आणि बदाम यांचा आहारात सेवन करू शकता. या दोन्ही गोष्टी खूप आपल्या शरीरसाठी चांगल्या आणि पोषक तत्वांचा चांगला स्त्रोत सुद्धा आहे आणि त्याचबरोबर त्यांचा प्रभावही खूप उष्ण असतो व त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आपल्या शरीराला आतून खूप उष्णता मिळते.
नट्स आणि सुकामेवा खाल्ल्याने आपल्या स्नायूंच्या दुखण्यापासून आपल्याला आराम भेटतो आणि त्याचबरोबर नट्स आणि सुकामेवा खाल्ल्यामुळे योग योग्य पचन होते वजन सांभाळते असे खूप प्रकारचे फायदे आपल्याला दिसून येतात.
6.कोमट पाणी आणि मसालेदार चहा
थंडीच्या दिवसांमध्ये आपले पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि शरीराला उत्तम प्रकारचा उष्णता देण्यासाठी मसाल्याच्या आणि कोमट पाणी यांचे सेवन अत्यंत उपयुक्त ठरते.या दोन्ही गोष्टी हिवाळ्यात शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आणि आराम प्रदान करतात.
कोमट पाणी : हे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराच्या पचनांच्या समस्यावर एक चांगल्या प्रकारचा उपाय आहे. सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिल्याने आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि आपली पचनक्रिया चांगली व सुरळीत राहते आणि याचमुळे संपूर्ण दिवसभर आपल्या शरीरात टाजगी टिकून राहते.कोमट पाणी शरीराची उष्णता वाढते वाढवते त्याचबरोबर रक्ताभिसरण सुद्धा सुधारते आणि शरीराला आत मधून खूप ऊब देतो.
मसालेदार चहा:मसालेदार चहा हिवाळ्यात शरीराला उबदार ठेवण्यास खूप मदत करते यामध्ये असलेले मसाले जसे की..लसूण,मिरी,आलं,दालचिनी हे आपल्या शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. ते आपल्या शरीराचे रोगप्रतिकार शर्ती सुद्धा वाढवतात.मसालेदार चहा पिऊन तुम्ही हिवाळ्यात सहजपणे उबदार आणि निरोगी राहू शकता. तुम्ही यांचा आपल्या आहारामध्ये रोज समावेश केल्याने तुमचे पचन सुरळीत राहते शरीराला उष्णता मिळते आणि तुम्ही निरोगी राहता.
तर तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली कमेन्ट मध्ये नक्की मला कळवा.आणि तुमचे काही समस्या असतील तर ते सुद्धा कमेन्ट मध्ये नक्की सांगा. तुमच आरोग्य हे खूप अमूल्य आहे त्याची काळजी घेणे हे तुमच कर्तव्य आहे. चला तर मग भेटू आपण पुढच्या पोस्ट मध्ये.. धन्यवाद ..!!