घरात Positive Energy ठेवण्यासाठी 10 सोपे उपाय: आपलं घर म्हणजे फक्त भिंती, छत आणि फर्निचर नाही. तर घर म्हणजे आपली उबदार जागा, जिथे आपण थकून परततो, जिथे आपल्या लोकांसोबत हसतो-रडतो, आणि आपल्या मनाला शांती मिळते. पण अनेकदा आपण अनुभवतो की घरात ताणतणाव वाढलाय, वातावरण जड झालंय, आणि उगाच मन खट्टू होतंय.
याचं मुख्य कारण म्हणजे घरामध्ये Negative Energy जमा होणे. मग त्यावर उपाय काय? तर घरात Positive Energy वाढवणं!
आता ही Negative Energy टाळायची आणि घरात Positive Energy आणायची तर काय करायचं? चला तर मग, आपल्यालाच सहज करता येतील असे १० सोपे उपाय जाणून घेऊया.
घर स्वच्छ ठेवा
जिथे घाण, पसारा, धूळ असेल तिथे Positive Energy टिकत नाही. जरा विचार करा तुम्ही टेबलावर ढीगभर कपडे, धुळकट पुस्तकं ठेवून बसला आहात. अभ्यासाला बसलात किंवा तुमच्या दुसऱ्या वैयक्तिक कामासाठी बसलात, पण लक्ष लागतंय का? नाही!घर रोज साफसफाई केल्याने मनही हलकं वाटतं.
माझ्या अनुभवातून सांगतो एकदा मी खोली नीट लावली, टेबल स्वच्छ केलं, लगेच अभ्यासात लक्ष लागलं आणि मूडही फ्रेश झाला.
हे पण वाचा: दररोज 10 मिनिटे स्वतःसाठी देण्याचे महत्त्व
सकाळचा सूर्यप्रकाश घरात येऊ द्या
सूर्यप्रकाश म्हणजे निसर्गाने दिलेली आपल्याला Positive Energy आहे. सकाळी खिडक्या उघडल्या की घरात ताजी हवा आणि प्रकाश येतो. तसेच डॉक्टर सुद्धा सांगतात की सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशमुळे Vitamin D मिळते. तसेच सूर्यप्रकाश मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर असतो.
घरात झाडं लावा
तुळस, मनीप्लांट, स्नेक प्लांट, अलोवेरा अशा प्रकारची झाडे घरात ठेवल्यावर वातावरण शांत होतं. वैज्ञानिकदृष्ट्या ही झाडं हवा शुद्ध करतात आणि मनाला सकारात्मक भावना देतात. झाडं म्हणजे जिवंत Positive Energy ची जणू battery आहे.
घरातल्या कोपऱ्यात जड वस्तूंचा पसारा ठेवू नका
जिथे खूप जुनी, न वापरणारी वस्तू ठेवलेली असते तिथे Negative Energy साचते असं तज्ज्ञ सांगतात. जुनी नको असलेली वस्तू दान करा, घर मोकळं ठेवा.
घरात हसू आणि आनंद पसरवा
फक्त वातावरण नाही, तर आपला मूडही घरात Positive Energy आणतो. मित्र-मैत्रिणी, घरच्यांसोबत वेळ काढा, एकत्र हसा, खेळा. एक छोटं हसूही वातावरण बदलून टाकतं.
बघा मंडळी, Positive Energy काही दुकानातून विकत मिळत नाही. ती आपणच तयार करायची असते. आपापल्या हसण्यातून, बोलण्यातून किंवा प्रेमातून. घरात सतत ओरडणं, रागावणं, कुरकुरणं चाललं तर Negative Energy वाढते.
पण एक छोटं हसू आणि दोन गोड शब्द इतकं पुरेसं आहे घराचं वातावरण बदलायला.
हे पण वाचा: रोज चालण्याचे (Walking) 10 फायदे: वजन कमी, तणाव दूर आणि आयुष्य निरोगी
संगीत किंवा मंत्र लावा
सकाळी देवपूजा, मंत्र पठण किंवा शांत संगीत लावलं तर घरात छान ऊर्जा निर्माण होते. मी स्वतः अनुभवलेलं आहे. सकाळी “ॐ” मंत्र ऐकल्यावर मन खूप शांत होतं.
सुगंधी वातावरण ठेवा
धूप, अगरबत्ती, सुगंधी मेणबत्त्या ह्यामुळे घरात ताजेतवानेपणा येतो. गंध हा थेट मेंदूवर परिणाम करतो आणि सकारात्मक विचारांना जागा करतो. आपण लहानपणी पाहिलंय ना, आई सकाळी धूप काढते. त्या सुगंधाने घरातलं वातावरण हलकं-फुलकं होतं.
घर उजेडात ठेवा
अंधार म्हणजे जडपणा, तर प्रकाश म्हणजे Positive Energy. म्हणून घरात नेहमी उजेड ठेवा. खिडक्या उघडा, लाईट्स नीट वापरा. अगदी छोटा दिवा लावला तरी घराला आणि मनाला उजेड मिळतो. रात्री मंद दिव्याच्या प्रकाशात बसणं म्हणजे अगदी स्वर्गीय शांतता मिळते.
सतत भांडणं आणि ताणतणाव टाळा
घरात जर रोज भांडणं, ओरडणं चाललं तर Positive Energy पळून जाते. मी खूप जागी पाहिलंय जर एखाद्या कुटुंबात सतत वाद असतो, आणि तिथं कोणी गेलं की स्वतःहून मन उदास होतं.
भांडणं टाळा, शांतपणे बोला. चर्चा करा. शांत घर म्हणजेच खरं Positive Energy च घर आहे.
कृतज्ञता (Gratitude) पाळा
आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानणं म्हणजे Positive Energy ची गुरुकिल्ली आहे. “देवा, तुझ्या आशीर्वादाने मला घर, अन्न, परिवार मिळाला” असं रोज मनात म्हटलं की समाधान मिळतं.
जो माणूस आभारी असतो तो नेहमी आनंदी असतो, त्याच्या घरात Positive Energy नक्कीच असते.
माझा छोटासा अनुभव
काही दिवस मी सकाळी घरात खिडक्या बंद ठेवून, पसाऱ्यात राहत होतो. खरंच, मूड सतत खराब होता. नंतर रोज खिडक्या उघडून, खोली स्वच्छ करून, एक झाड लावलं. फरक लगेच जाणवला. माझ मन खुश झालं, कामामध्ये लक्ष सुद्धा लागू लागलं.
Positive Energy चे फायदे
- घरात शांतता आणि समाधान मिळतं.
- नातेसंबंध घट्ट होतात.
- कामात लक्ष वाढतं.
- आरोग्यावर चांगला परिणाम होतो.
- ताणतणाव कमी होतो.
निष्कर्ष:
घर हे फक्त राहण्यासाठी जागा नाही, तर आपली ऊर्जा घेऊन जाणारी जागा आहे. जर घरात Positive Energy असेल तर मन आनंदी राहतं, आयुष्य हलकं होतं आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने सुरू होतो.
म्हणूनच, वर दिलेले १० छोटे उपाय करून बघा. खरंच, घराचं वातावरण बदलेल आणि तुमचं आयुष्यही बदलून जाईल.
तुमच्या घरात Positive Energy टिकवण्यासाठी तुम्ही काय करता? कमेन्ट मध्ये नक्कीच सांगा.तसेच हा लेख तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा
FAQ:
1. घरात Positive Energy म्हणजे नक्की काय असतं?
Positive Energy म्हणजे घरात शांती, आनंद, समाधान आणि चांगली भावना टिकून राहणं. म्हणजे भांडणं, ताण, नकारात्मक विचार कमी होऊन हसत-खेळत वातावरण असणं.
2. घरात Positive Energy ठेवण्यासाठी रोज पूजा-पाठ करणं आवश्यक आहे का?
पूजा करणं ही एक चांगली सवय आहे, पण Positive Energy टिकवण्यासाठी रोज पूजा करणं बंधनकारक नाही. हसतमुख राहणं, स्वच्छता ठेवणं, एकमेकांशी प्रेमाने बोलणं हेही तितकंच महत्वाचं आहे.
3. Vastu Shastra Positive Energy साठी खरंच काम करतं का?
काही लोक त्यावर विश्वास ठेवतात, काही नाही. पण खरं पाहिलं तर स्वच्छता, मोकळा प्रकाश, ताजी हवा हे Positive Energy टिकवण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.
4. घरात Positive Energy टिकवण्यासाठी कोणत्या छोट्या सवयी मदत करतात?
दररोज हसणं, एकत्र जेवणं, एकमेकांना वेळ देणं, झाडांना पाणी घालणं आणि सकाळी सूर्यप्रकाशात बसणं या छोट्या छोट्या सवयी खूप मदत करतात.
5. Negative Energy घरातून कशी कमी करता येईल?
राग, भांडणं, घाण, अंधार हे सर्व Negative Energy वाढवतात. त्यामुळे स्वच्छता, चांगलं वातावरण, आणि हसतमुख राहणं याने Negative Energy आपोआप कमी होते.
6. Positive Energy मुळे खरंच आरोग्य सुधारतं का?
हो! संशोधनात दिसून आलंय की Positive Energy मुळे मन शांत राहतं, ताण कमी होतो, झोप चांगली लागते आणि आरोग्य आपोआप सुधारतं.
हे पण वाचा: आरोग्यासाठी वाईट असलेल्या 5 सवयी टाळा
