रोज चालण्याचे (Walking) 10 फायदे: वजन कमी, तणाव दूर आणि आयुष्य निरोगी: मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आपलं शरीर हालचालीपासून दूर जात आहे. ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम, घरी गेल्यावर मोबाईल-टीव्ही, आणि सकाळी उशिरापर्यंत झोप… यात आपलं शरीर जड, थकल्यासारखं, आणि आजारी पडायला तयार होतं.
पण तुम्हाला माहीत आहे का, एक छोटीशी सवय म्हणजेच रोज 30 मिनिटं चालणं. हे तुमचं आयुष्य बदलू शकते. चालणं हे औषधासारखं आहे, त्याला पैसे लागत नाहीत आणि साइड इफेक्टसुद्धा नाहीत. फक्त थोडा वेळ आणि थोडी इच्छा हवी.चालणे हा एक साधा, सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे, जो कोणीही करू शकतो. यासाठी कोणत्याही महागड्या उपकरणांची किंवा जिमची गरज नाही.
चला तर मग, पाहूया रोज चालण्याचे 10 जबरदस्त फायदे, जे तुमचं आरोग्य, मन आणि आयुष्य दोन्ही सुधारतील.
हृदय मजबूत राहते
चालणे हा हृदयासाठी सर्वात चांगला व्यायाम मानला जातो. रोज 30 मिनिटं चालल्याने रक्ताभिसरण सुधारतं.हृदयाचे स्नायू मजबूत होतात आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.
अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार, नियमित चालणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका 30-40 % ने कमी होतो. वेगात चालण्याचा प्रयत्न करा, म्हणजे थोडासा दम लागेल पण बोलता येईल.
वजन कमी होण्यास मदत
जर तुमचे वजन खूप वाढले आहे आणि तुम्हाला वजन कमी करायचे आहे तर चालणे हा एक उत्तम पर्याय आहे. जिमला न जाणारे, डाएट न पाळणारे लोकसुद्धा फक्त चालण्याने वजन कमी करू शकतात.
रोज 30 मिनिटे वेगात चालल्याने 150-200 कॅलरीज जळतात. रोजच्या चालण्यामुळे शरीराचा मेटाबॉलिझम वाढतो, म्हणजे दिवसभरात जास्त कॅलरीज खर्च होतात.सकाळी चालणं सर्वोत्तम, कारण त्या वेळी शरीर फॅट बर्निंग मोडमध्ये असतं.
साखरेवर (Diabetes) नियंत्रण राहतं
चालणं हे एक डायबेटीस रुग्णांसाठी जणू सोन्याचं औषधच आहे. चालल्याने शरीरातील पेशी इन्सुलिनला चांगला प्रतिसाद देतात, ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं.
2012 मध्ये “Diabetes Care” जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, दिवसातून 15-20 मिनिटं चालणं डायबेटीस टाळण्यात प्रभावी आहे. जेवल्यानंतर हलकंसं चालणं रक्तातील साखर झपाट्याने कमी करतं.
हाडं आणि सांधे मजबूत करते
नियमित चालण्याने तुमच्या पायांचे, पोटाचे आणि पाठीचे स्नायू मजबूत होतात.चालणं हे तुमच्या हाडांची घनता (Bone Density) वाढवतं, ज्यामुळे ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होतो.
सांध्यामध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि stiffness कमी होते.विशेषतः गुडघे दुखणाऱ्यांसाठी चालणं हा सुरक्षित व्यायाम आहे.सकाळच्या उन्हात चाललात तर व्हिटॅमिन D मोफत मिळतं.
मानसिक तणाव कमी होतो
चालणं हे फक्त शरीरासाठीच नाही, तर मनासाठीसुद्धा औषध आहे. चालल्याने तुमच्या मेंदूत ‘एंडॉर्फिन’ नावाचं हॉर्मोन तयार होतं, जे कि तुम्हाला नैसर्गिक आनंद देतं.मोकळ्या हवेत चालताना निसर्गाच्या सानिध्यात आल्याने मन प्रसन्न होते.
चालताना तुम्ही तुमच्या विचारांवर लक्ष केंद्रित करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीचा विचार न करता फक्त शांतपणे चालू शकता.तणाव, चिंता, नैराश्य कमी होतं. शक्य असल्यास निसर्गात चालण्याचा प्रयत्न करा. झाडं, पक्ष्यांचा आवाज, ताजी हवा… हे मनाला शांत करतात.
पचनक्रिया सुधारते
जेवल्यानंतर हलकंसं चालल्याने अन्न लवकर पचतं. गॅस, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता कमी होते. भारी जेवणानंतर लगेच जोरात चालू नका, पण 15-20 मिनिटांनी आरामात चालायला सुरुवात करा.
हे पण वाचा: दिवसात किती वेळा पाणी प्यावे आणि कसे प्यावे? संपूर्ण माहिती
रोगप्रतिकारशक्ती वाढते
चालल्याने शरीरात रक्तप्रवाह वाढतो, ज्यामुळे पांढऱ्या रक्तपेशी (White Blood Cells) सक्रिय होतात.नियमित चालणाऱ्या लोकांमध्ये सर्दी-खोकला, ताप कमी प्रमाणात होतो.मित्रांनो थंड हवेत चालण्याची सवय लावा,रोगप्रतिकारशक्ती आणखी मजबूत होते.
झोप उत्तम लागते
जर तुम्हाला रात्री चांगली झोप लागत नसेल, तर रोज संध्याकाळी किंवा सकाळी फिरायला जा. दिवसभर केलेल्या शारीरिक हालचालींमुळे शरीर थकते आणि रात्री शांत व गाढ झोप लागते.झोपेचा त्रास असलेल्या लोकांनी दिवसातून किमान 30 मिनिटं चालायला हवं.रात्री जेवणानंतर 10-15 मिनिटं हलकंसं चालणं झोप सुधारते.
मेंदू तल्लख होतो
चालण्यामुळे मेंदूत रक्तपुरवठा वाढतो, ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते.वृद्धापकाळात विस्मरण (Dementia) टाळण्यास मदत होते.सकाळचं चालणं मेंदूसाठी खास फायदेशीर आहे, कारण त्या वेळी हवा शुद्ध आणि ऑक्सिजन जास्त असतो.
आयुष्याची गुणवत्ता वाढते
चालणारे लोक साधारणपणे जास्त जगतात.चालणं तुम्हाला ऊर्जावान, आनंदी आणि सक्रिय ठेवतं.चालणं हा खर्च न लागणारा सर्वोत्तम गुंतवणुकीचा प्रकार आहे. आरोग्यावर केलेली गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभर परतावा देते.
निष्कर्ष :
चालणे (Walking) ही अशी गोष्ट आहे की, तुम्ही कुठेही, कधीही सुरू करू शकता. यासाठी जिम, ट्रेनर किंवा महागडे शूज लागणार नाहीत. फक्त थोडी इच्छाशक्ती आणि सातत्य हवं. आजपासून रोज 30 मिनिटं चालायला सुरुवात करा आणि 1 महिन्यानंतर तुमच्या शरीरात आणि मनात झालेला बदल स्वतः अनुभवा. आणि हो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्की सांगा.
डिस्क्लेमर: हा लेख सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणत्याही मोठ्या शारीरिक समस्येसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
FAQ :
1. रोज चालायला किती वेळ द्यावा?
दररोज किमान 30 मिनिटं वेगात चालणं आरोग्यासाठी पुरेसं आहे. सुरुवातीला 15-20 मिनिटं चालून हळूहळू वेळ वाढवू शकता.
2. चालायला सकाळची वेळ चांगली की संध्याकाळची?
सकाळी चालणं सर्वोत्तम मानलं जातं कारण त्या वेळी हवा ताजी असते, पण संध्याकाळी चालणंही चांगलंच आहे. मुख्य म्हणजे नियमित चालणं महत्त्वाचं आहे.
3. चालण्याने वजन खरंच कमी होतं का?
होय, रोज वेगात चालल्याने कॅलरीज जळतात, मेटाबॉलिझम वाढतो आणि त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
4. चालण्यासाठी महागडे शूज किंवा साधनं लागतात का?
नाही, आरामदायी शूज आणि सैलसर कपडे पुरेसे आहेत. चालणं हा सर्वात सोपा आणि कमी खर्चिक व्यायाम आहे.
5. डायबेटीस असलेल्या लोकांनी चालायला हवं का?
नक्कीच! चालल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहतं आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढते.
6. रोज किती पावलं चालणं योग्य आहे?
जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), दिवसाला 8,000–10,000 पावलं चालणं चांगलं मानलं जातं.
7. रोज चालणं आयुष्य वाढवतं का?
होय, संशोधनानुसार नियमित चालणारे लोक जास्त काळ जगतात आणि त्यांचं जीवनमान चांगलं असतं.
हे पण वाचा : सकाळी उठल्यावर कोमट पाणी पिण्याचे फायदे,जाणून घ्या !