Tips For Weight Loss : केवळ 7 दिवसात सोप्या पद्धतीने वजन कमी करा !

Tips For Weight Loss : केवळ 7 दिवसात सोप्या पद्धतीने वजन कमी करा ! :

“मला अस वाटत आहे की माझ वजन खूप वाढल आहे आणि मला आता थोड बारीक होण्याची गरज आहे”.असा प्रश्न आपल्या मनामध्ये कधी न कधी पडला असेल.आजच्या धावपळीच्या आयुष्यात वजन वाढणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. वजन वाढले म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका.

वजन जरी वाढले तरी त्याला कमी करता येते. वजन कमी करणे म्हणजे माऊंट एवेरेस्ट चढणे एवढ अवघड नाही.(just kidding )अन्नाच्या चुकीच्या सवयींमुळे वजन वाढणे ही आता एक सामान्य समस्या झाली आहे. पण, त्याचा परिणाम केवळ दिसण्यावरच नाही तर आपल्या आरोग्यावरही होतो. वाढलेले वजन हृदयविकार, मधुमेह, सांधेदुखी आणि इतर अनेक आजारांचे मुख्य कारण ठरू शकते.

मग, हे वजन कमी कस कारायच? हा प्रश्न तुम्हाला कडचीत पडला असेल ते टेंशन घेऊ नका मी आहे न !! चला ,तर सुरू करूया की हे वजन कमी कस करायच ते..

1.चवदार पदार्थ खाणे कमी करा.

वजन कमी करण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा म्हणजे चवदार पदार्थ खाण्याची लागलेली चटक. एकदा मिठाईच्या
दुकानासमोरून जाताना जवळपास येणाऱ्या गोड वासामुळे तो पदार्थ घेण्याचा मोह आपल्याला आवरत नाही पण आपण जर नियमित योगा केल्यामुळे आपल्या मनावर ताबा ठेवन सोपे होते.

ध्यान व योगा केल्यामुळे आपले मन खूप जागरूक राहते. .आपल्याला खाण्यापिण्याबाबत थोडी सतर्कता वाढते. मग जेव्हा पण तुम्ही कधी चॉकलेट किंवा चिप्स खायला जाल तेव्हा तुम्ही सतर्क व्हाल. तुम्हाला आठवण की जर मी हे ख्याल तर माझे वजन वाढेल.

मग तुम्ही त्याऐवजी तुम्ही दुसरं काहीतरी पौष्टिक पर्याय म्हणून काहीतरी खाऊ शकता,पण जर तुम्ही सतत योगा व व्यायाम करत असाल तर कालांतराने तुमची ती इच्छा नाहीशी होते मग तुम्ही ते चिप्स किंवा चॉकलेट घेण्यास कधी जाणार नाही,

कारण ध्यान केल्यामुळे आपल मन नाही तर आपल संपूर्ण शरीर पण आपल्या ताब्यात असते. हिच तर जादू आहे ध्यान (meditation) ची.त्यामुळे होईल तेवढं योगा आणि व्यायाम करणं गरजेचं आहे कारण त्यामुळे आपल्या शरीर तंदुरुस्त आणि सतत जागृत असते.

2.भरपूर भाज्या खा आणि तणावापासून दूर राहा.


जेव्हा केव्हा तुम्हाला चॉकलेट किंवा इतर चटकदार खाण्याची इच्छा होईल, तेव्हा तुम्ही थोडासा विचार करा की मी हे का खात आहे? याचा काय परिणाम होईल माझ्या शरीरावर? का मी हे यामुळे खात आहे की हे खाल्ल्यामुळे मी माझा तणाव कमी करेल.

मनातील आपल्या तणावामुळे आपल्याला काहीतरी वारंवार खाण्याची इच्छा होत राहते आणि त्याचमुळे आपल्या थोडाफार तणाव निवळतो. पण हा तनाव आपण कमी करू शकतो ते म्हणजे ध्यान ध्यान केल्याने,ध्यान केल्यामुळे आपल्या शरीर आपल्या कंट्रोल राहतं.

ध्यान करणे म्हणजे हे आपलं नैसर्गिकरित्या तणाव कमी करण्याचे आणि वजन कमी करण्यास सुद्धा एक मात्र चांगलं साधन आहे.त्यामुळे होईल तेवढं ध्यान (मेडिटेशन) किंवा योगा करा कारण त्यामुळे आपल शरीर आपल्या कंट्रोल मध्ये असतं त्यावर कोणाचा ताबा नसतो आपलं मन भटकत नाही,त्यामुळे धान खूप महत्त्वाचे आहे.

होईल तेवढ ताज्या भाज्या खा. बाहेरच जास्त खान टाळा.

3. लिंबू पाणी पिण्याची सवय लावा.

जर तुमचे वजन वाढले असतील तर लिंबू पाणी हा वजन कमी करण्यासाठी अतिशय चांगला आणि उत्तम पर्याय आहे.
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, जे आपल्या पचनक्रियेला उत्तम ठेवण्यासाठी चालना देतं आणि त्यामुळे आपली पचन क्रिया सुरळीत राहते.

लिंबू पानी पिण्याची सवय लावा कारण लिंबू पानी हे चरबी कमी करण्यास मदत करते. मग तुम्हाला आता हा प्रश्न पडला असेल की बाबा आता हे लिंबू पानी सकाळी लवकर उठल्या उठल्या कस प्यायच.चला तर मग पाहूया की हे लिंबू पाणी सकाली उठल्या उठल्या कस काही प्यायच ते.

सकाळी उठल्यानंतर कोमट पानी घ्या आणि त्या कोमट पाण्यात लिंबाचा रस टाका. हवे असल्यास त्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा मध मिसळू शकता आणि हे सर्व मिसळून प्या.

यामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासाला सुरुवात होते. तुम्हाला मी आणखी काही सांगू शकतो की लिंबू पाणी फक्त वजन कमी करायला मदत करत नाही, तर त्वचा तेजस्वी ठेवण्यासही मदत करते.लिंबू पाणी पिण्याचे खूप फायदे आहेत त्यामुळे लिंबू पानी सकाळी उठल्या उठल्या पिलेच पाहिजे.रोजच्या आहारात लिंबू पाणी समाविष्ट करणं खूपच फायदेशीर आहे.

4.पाणी जास्त प्या.

पानी जास्त पिणे खूप गरजेच आहे आपल्या शरीरसाठी. पानी जास्त पिन का गरजेच आहे कारण जवळ पास 80% हे पाणीच असत आपल्या शरीरामद्धे याच कारणामुळे पानी जास्त पिणे आणि आपल्या शरीराला हायड्रेट ठेवण खूप गरजेच आहे.

आपण जर जास्त पिलो तर आपली भूक आपल्या नियंत्रणावर राहते व भूक लागण्याची संभावना थोडी कमी राहते. तसेच आपल्या शरीरातील चयापचयाची क्रिया सुद्धा वाढते आणि त्याचमुळे तुमचे वजनही वेगाने नियंत्रित होते. जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरातील चरबीही नियंत्रणात राहते.

जेवणाच्या आधी जर का तुम्ही पाणी पिल्या तर आपल पोट भरण्याची भावना होते, ज्यामुळे तुम्ही जास्त अन्न खाण्यापासून वाचता. यामुळे कॅलरीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.

दररोज 2.5 ते 3 लिटर पाणी पिणे योग्य मानले जाते . मात्र, शारीरिक श्रम, हवामान, आणि वय यानुसार हे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.

पाणी पिणे हा वजन कमी करण्याचा सर्वांत सोपा आणि प्रभावी उपाय आहे. तुम्ही कोणत्याही कसरती किंवा डाएट प्लॅनचा अवलंब करत असाल, तरी पाणी पिण्याची सवय लावणे खूप महत्त्वाचे आहे.

5. फक्त घरचे जेवण जेवावे

हेल्थ तज्ज्ञ सांगतात की फक्त घरचे जेवण जेवावे. घरचे जेवण करणे हे आपल्या शरीरासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. होईल तेवढे बाहेरचे जेवण किंवा जंक फूड टाळा कारण जेवढे जेवण घरच चांगला असतं तेवढं बाहेरचं नसतं,कारण आपण जे पण काही खातो ते सर्व आपलं फ्रेश असतं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्वात पहिलं बाहेरच्या जंक फूड खाणं बंद करा कारण त्यामुळे आपल्याला नको ती चरबी आपल्या शरीरात वाढते आणि वजन वाढण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो आपल्या घरचे जेवण चांगलं खा.

तसेच मैदा, साखर, तळलेले पदार्थ खाणे टाळावे. कारण मैद्यामध्ये फायबर नसल्यामुळे तो लवकर पचतो आणि भूक लवकर लागते. यामुळे आपण अधिक भूक लागल्या सारख वाटत आणि आपण खात राहतो. साखर पण जर आपण जास्त खाली तर काही वेळाने अधिक गोड खाण्याची इच्छा होते व त्यामुळे कॅलरी वाढते.

घरचे जेवण करा कारण जेवणात अत्यंत पौष्टिक तत्व असतात त्यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत मिळते.

6.नाश्त्यामध्ये या पदार्थाचे सेवन करा

वजन कमी करण्यामागे नाश्ताच पण खूप मोठं योगदान आहे,कारण जेव्हा पण आपण नाष्टा करतो तेव्हा आपल्याला भूक कमी लागते व आपण जास्त जेवत नाही. तर चला पाहूया की नाश्ता काय करायचं ते ?

1.पोहा

पोहा हा हलका आणि खूप उर्जादायक नाश्ता आहे. त्यात भाज्या, लिंबू आणि कोथिंबीर घालून त्याला थोड चटकदार बनवा आणि खा.

2.उपमा

उपमा हा फायबरयुक्त आणि चटकदार नाश्ता आहे,आणि तो पचायलाही सोपा आहे.

3. स्प्राउट्स (मटकी, मूग)

स्प्राउट्समध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर असतात. लिंबू, चाट मसाला घालून खाल्ल्यास त्याची चव वाढते. हा नाश्ता वजन कमी करणाऱ्यांसाठी खूप चांगला पर्याय आहे.

4. डोसा किंवा इडली

तांदूळ आणि डाळीपासून बनवलेली इडली किंवा डोसा हे पचनाला हलके आणि असतात.सांबार आणि चटणीसोबत हा परिपूर्ण नाश्ता ठरतो.

यासोबतच दुसरा पण तुम्ही नाश्ता करू शकता.

7.निष्कर्ष :

वजन कमी करणे हा एक दिवसाचा खेळ नाही,तर त्यासाठी आपल्या शरीराची आणि मनाची इच्छा सुद्धा असली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या जिभेवर सुद्धा ताबा असले पाहिजे.आपण जर जास्त बाहेरचं फास्टफूड जर खायला लागलो तर आपलं वजन नक्कीच कमी नाही होणार. त्यासाठी जीबी वर सुद्धा ताबा आपला असलाच पाहिजे तसेच तुम्ही सकाळच्या नाष्टा सुद्धा करण तिथकेच गरजेच आहे जितक की आपल्या शरीराला पाण्याची गरज आहे.कारण नाश्ता हाआपल्या शरीराचे ऊर्जेचा स्त्रोत आहे.

तर ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेन्ट मध्ये नक्की मला कळवा आणि तुमच प्रेम दाखवा,धन्यवाद !!

Sharing Is Caring:

2 thoughts on “Tips For Weight Loss : केवळ 7 दिवसात सोप्या पद्धतीने वजन कमी करा !”

Leave a Comment

Verified by MonsterInsights