मोबाइलमुळे लक्ष हरवतंय? अभ्यासात लक्ष मिळवण्यासाठी 7 सोपे टिप्स जाणून घ्या !

आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अभ्यासात लक्ष केंद्रित करणं हे एक खरंच मोठं आव्हान आहे. मग तुम्ही शाळेतले विद्यार्थी असाल, कॉलेज मधले तरुण असाल किंवा नोकरी करताना नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करत असाल, एक गोष्ट सगळ्यांना त्रास देते आणि मला सुद्धा जेंव्हा मी शाळेत किंवा महाविद्यालयात शिकायला होतो, ते म्हणजे अभ्यास करताना मन न लागणे.

मोबाईलवर येणारे मेसेज, सोशल मीडियावरच्या नोटिफिकेशन्स, घरातली गडबड, किंवा मनातले विचार यामुळे अभ्यासात लक्ष लागणं खूप कठीण होतं. कधी कधी तर असं वाटतं की पुस्तक तर समोर आहे पण लक्ष कुठे तरी दुसरीकडे आहे? आणि कधी कधी तर अभ्यास करताना झोपच येते. 10 मिनिटं अभ्यास केला की मोबाईलकडे लक्ष जातंय, खिडकीबाहेर काय चाललंय हे बघावंसं वाटतंय. हे अगदी नॉर्मल आहे. पण परीक्षा जवळ आली की मग घाई होते. तेव्हा वाटतं कि, “काय करावं की अभ्यासात लक्ष लागेल?”

पण आता काळजी करू नका. आज आपण अशा काही सोप्या आणि सर्वाना समजतील अशा सोप्या पद्धती पाहणार आहोत. जे कि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी खूप मदत करतील. या टिप्स च्या मदतीने तुम्ही तुमचं लक्ष अभ्यासावर केंद्रित करू शकता. चला तर मग, सुरुवात करूया !

1. अभ्यासाची जागा नीट करा

सर्वात आधी तुम्ही तुमची अभ्यास करण्याची जागा नीट करा. कारण अभ्यासाची जागा ही एकाग्रतेचा आधार आहे. जर तुमच्या टेबलावर सगळं अस्ताव्यस्त पडलंय, भिंतीवर विचित्र पोस्टर लावलंय किंवा खिडकीतून रस्त्यावरचं गोंगाट येत आहे , तर लक्ष लागणं कठीण होऊन जाते. म्हणून एक शांत, स्वच्छ आणि मोकळी जागा निवडा.

  • टेबल स्वच्छ ठेवा : टेबलवर फक्त तुम्हाला लागणारी पुस्तक, वही आणि पेन जवळ ठेवा. बाकी सगळं बाजूला काढा.
  • प्रकाश आणि हवा: जिथे बसतोस तिथे पुरेसा प्रकाश आणि हवा यायला हवी. अंधारात किंवा  अस्वच्छ जागेत अभ्यास करणं डोक्याला खूपच त्रासदायक ठरतं.
  • मोबाईलपासून लांब राहा: अभ्यास करत असताना मोबाईल जवळ ठेवलात, तर तुमच मन त्याकडे ओढलं जाणारच. म्हणून तो सायलेंट करून दुसऱ्या खोलीत ठेवा .

मी जेंव्हा शिकायला होतो आणि माझं अभ्यासात मन लागत नव्हत तेंव्हा मी माझ्या अभ्यासाच्या जागेला “ध्यान मंदिर” असं नाव दिलं होतं. जेंव्हा केंव्हा मी त्या जागेवर बसायचो, “तिथे गेल्यावर मला फक्त अभ्यासाचाच विचार येत असे.” तुम्ही पण एकदा असं काहीतरी करून बघाच.

2. वेळेचं योग्य नियोजन करा

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि वेळेचं नियोजन कसं करायच चला तर, मग जाणून घेऊया. तुम्हाला असं वाटतंय का की तासन् तास अभ्यास करणं म्हणजेच जास्त शिकणं होय? तर तुम्ही चुकीचे आहात, तस काहीच नसते. खूप वेळ अभ्यास केल्याने मेंदू दमतो आणि लक्ष भटकायला लागतं. त्यापेक्षा छोटे-छोटे अभ्यासाचे सत्र ठेवा.

  • पोमोडोरो तंत्र (pomodoro technique): हे एक सुपर सोपं तंत्र आहे आणि हि टेक्निक मी आता सुद्धा माझ्या अभ्यासात वापरतो. फक्त 25 मिनिटं अभ्यास करा, मग 5 मिनिटं विश्रांती घ्या. असे 4 सत्र झाले की 15-20 मिनिटांचा मोठा ब्रेक घ्या. यामुळे तुमचा मेंदू थकणार नाही आणि जास्त वेळ ताजातवाना राहता.
  • दिवसाचा बेस्ट वेळ निवड: कोणाला सकाळी अभ्यास करायला आवडतं, तर कोणाला रात्री आवडतं. तुम्हाला जेव्हा ताजं वाटतं, तेव्हा अभ्यासाला बसा.
  • सुरुवातीला छोटसं ध्येयं ठेवा: “आज मी 3 तास अभ्यास करणार” असं म्हणण्यापेक्षा, “आज मी गणिताचे 10 प्रश्न सोडवणार” असं ठरवलं की काम सोपं होतं.

3. मेंदूला ताण देऊ नका

अभ्यास करताना मेंदूला जास्त ताण देऊ नका. आपला मेंदू हा मशीन नाही, त्याला विश्रांती हवी. तुम्ही जर रात्रभर जागून अभ्यास करत असशाल, तर तुमचं लक्ष कधीच केंद्रित होणार नाही. म्हणून काही गोष्टी लक्षात ठेवा:

  • झोप पूर्ण घ्या: रात्री 7-8 तास झोप घेतल्याशिवाय तुमचा मेंदू नीट काम करणार नाही.
  • पाणी आणि जेवण वेळेवर घ्या: अभ्यास करताना पाण्याची बाटली जवळ ठेवा जे कि मी आता सुद्धा जवळ ठेवतो. थोड्या-थोड्या वेळाने पाणी पित जा. तसंच हलकं-फुलकं काहीतरी खा, जसं की फळं, सुकामेवा. जास्त जंक फूड खाऊ नका, ते टाळा.
  • व्यायाम करा: रोज 10-15 मिनिटं चालणं, योगा किंवा स्ट्रेचिंग केल्याने मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि एकाग्रता वाढते.

एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमच शरीर आणि मन तंदरुस्त असेल तर,तुमच अभ्यासात लक्ष केंद्रित लवकर होते.

4. विचलनापासून दूर राहा

सध्याच्या काळात आपल्या सर्वांचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे विचलन (distractions). त्यात मोबाईल, टीव्ही, सोशल मीडिया(जसे कि, Instagram,Facebook,) हे सगळे तुमच्या एकाग्रतेचे सर्वात मोठे अडथळे आहेत. पण यावरही काही उपाय आहेत:

  • मोबाईल लॉक करा : जे मोबाईल अ‍ॅप्स तुमचं लक्ष वेधून घेतात, ते मोबाईल अ‍ॅप्स काही वेळासाठी लॉक करा. असे पण काही अ‍ॅप्स आहेत जे कि तुमचे अ‍ॅप्स थोड्या वेळासाठी लॉक करतात, जसं की Forest किंवा Focus@Will. या अ‍ॅप्स मुळे तुम्हाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल.
  • सोशल मीडियापासून ब्रेक घ्या: अभ्यासाच्या वेळेत मोबाईलचे नोटिफिकेशन्स बंद करा. किंवा अजिबातच मोबाईल जवळ ठेवू नका.
  • कुटुंबाला सांगा: तुमच्या घरच्यांना सांगा की तुम्ही अमुक वेळी अभ्यास करणार आहे, आणि त्यांनी तुम्हाला त्या वेळेत डिस्टर्ब करू नये.

माझा एक मित्र तर अभ्यासाला बसण्याआधी त्याच्या आईला सांगतो, “आई, माझा फोन तुझ्याकडे ठेव आणि माझा अभ्यास संपवल्याशिवाय परत देऊ नको!” आणि खरंच, यामुळे अभ्यासात लक्ष खूप केंद्रित होते.

5. अभ्यास करण्याची पद्धत बदला

कधी-कधी अभ्यास कंटाळवाणा वाटतो, कारण आपण तेच-तेच करत बसतो आणि नंतर अभ्यास करू नये असं वाटते. मग अशावेळी अभ्यासात थोडा बदल करून बघा:

  • महत्वाच्या नोट्स बनवा : फक्त वाचण्यापेक्षा रंगीत पेनाने नोट्स बनवा (जसे कि, IMP पॉईंट्स). डायग्राम, चार्ट, टेबल यामुळे अभ्यासाची गोडी वाढते.
  • ग्रुप स्टडी करा : मित्रांसोबत अभ्यास करणं मजेदार असतं. पण लक्षात ठेवा , गप्पा मारण्यापेक्षा अभ्यासावरच लक्ष द्या.
  • ऑडिओ-व्हिडिओ चा वापर करा : काही गोष्टी यूट्यूबवर बघा किंवा ऑडिओ रेकॉर्डिंग ऐका. यामुळे विषय समजायला सोपं होतं.

मी माझ्या कॉलेजच्या दिवसांत मी गणित शिकायचो तेव्हा डायग्राम बनवायचो. त्यामुळे गणिताची भीती कमी झाली आणि अभ्यासाची मजा वाटायला लागली.

6. ध्यान आणि मेडिटेशन करा

तुम्हाला अभ्यासामद्धे लक्ष केंद्रित करण्यास आणि कोणत्याही क्षेत्रात कामी येणारं ते म्हणजे ध्यान (Meditation) करणे . कमीत कमी रोज 5-10 मिनिटं शांत बसून फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमच, मन शांत होतं आणि एकाग्रता वाढते. मेडिटेशन अ‍ॅप्ससारखे Headspace किंवा Calm वापरून बघा. किंवा फक्त शांत जागी बसून डोळे बंद करा आणि श्वास घ्या – सोडा.

असे केल्याने मन अगदी शांत होतं आणि अभ्यासात मन सुद्धा रमतं.

7. स्वतःला समजून घ्या

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला स्वतःला विचारायचं आहे कि, माझं लक्ष का भटकतंय? प्रत्येकाचं कारण वेगळं असू शकते. कोणाला मोबाईलमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही, तर कोणाला घरातल्या गोंधळामुळे, तर कोणाला मनातले विचारच शांत बसू देत नाहीत. मग पहिलं पाऊल आहे, तुमचं लक्ष का भटकतंय हे ओळखायचं. एकदा का तुम्हाला कारण कळलं, की त्यावर उपाय शोधणं पण अगदी सोपं होतं.

उदाहरणच घेऊन सांगतो. समजा, तुम्ही अभ्यासाला बसला आहात आणि पाच मिनिटांतच तुमचं मन इन्स्टाग्रामवर जातं. मग तुम्ही स्वतःला विचारा कि, “मी मोबाईल का उचलतो?” कदाचित तुम्हाला कंटाळा येतोय किंवा तुम्हाला अभ्यास कठीण वाटतोय. एकदा का हे कारण कळलं, की तुम्ही उपाय शोधू शकता. म्हणून स्वतःला ओळखणं हे पहिलं पाऊल आहे.

निष्कर्ष:

बघा, अभ्यासात लक्ष केंद्रित करणं हे काही अवघड नाही, फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास हवा. थोडं नियोजन, थोडी मेहनत आणि थोडा धीर धरला की तुम्ही नक्कीच यशस्वी होशाल.तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी अभ्यास हाच मित्र आहे.

तर मित्रांनो, आजपासूनच सुरुवात करा. तुमच्या अभ्यासाच्या टेबलावर बसा, मोबाईल बाजूला ठेवा आणि फक्त 25 मिनिटं अभ्यास करून बघा . मला खात्री आहे कि, तुम्हाला याची सवय लागेल आणि तुमचं लक्ष कधी भटकणारच नाही.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

1. अभ्यासात लक्ष लागत नसेल तर काय करावं?

सगळ्यात आधी मोबाईलला दूर ठेवा. मग वेळ ठरवा, छोट्या छोट्या टप्प्यात अभ्यास करा आणि ब्रेक्स घ्या.

2. मोबाईलशिवाय लक्ष लागत नाही, काय करू?

“Focus Mode” अ‍ॅप्स वापरा, अभ्यास करताना मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. सुरुवातीला कठीण जाईल पण हळूहळू सवय लागते.

3. ध्यान किंवा प्राणायाम खरोखर उपयोगी आहे का?

हो. फक्त 5 मिनिटं रोज ध्यान केल्याने मनावर खूप मोठा परिणाम होतो. एकदा ट्राय करून पहा. स्वतःच फरक कळेल.

4. अभ्यास कंटाळवाणा वाटतो, काय करावं?

अभ्यासाचं स्वरूप बदला.व्हिडीओ, पॉडकास्ट, रंगीत नोट्स वापरा. आवडीच्या गोष्टींमध्ये अभ्यास मिसळा.

5. अभ्यास करताना झोप येते, काय उपाय?

जड जेवण टाळा. चेहरा धुवा, उभं राहून थोडं स्ट्रेचिंग करा आणि प्रकाश असलेल्या खोलीत अभ्यास करा.

तर मित्रांनो, हा लेख वाचून थोडी जरी अभ्यासा बद्दल माहिती मिळाली असेल,तर खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Sharing Is Caring:

मी कोण आहे?तर मी गेल्या काही वर्षापासून स्वतःवर काम करत आहे.स्व-उन्नती(Self Improvement), सकारात्मक विचार, वेळेचं व्यवस्थापन, यशस्वी सवयी आणि शांत मन या गोष्टी मी स्वतः अनुभवून शिकल्या आहेत. या प्रवासात जे काही मला उपयोगी वाटलं, जे खरंच तुमच आयुष्य बदलेल. तेच मी इथं लिहतो.माझं एकच उद्दिष्ट आहे कि, "सोप्या शब्दात प्रेरणा देणं आणि लोकांच्या आयुष्यात छोटा का होईना, पण सकारात्मक बदल घडवणं." माझे लेख अनुभव, अभ्यास आणि रोजच्या जीवनात वापरता येतील अशा सवयींवर आधारित असतात. माझा विश्वास आहे कि,प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्याची एक संधी असतो.

Leave a Comment

Verified by MonsterInsights