मोबाईलवरचा वेळ कमी करून Productive कसं व्हायचं?

मोबाईलवरचा वेळ कमी करून Productive कसं व्हायचं?: आजकाल आपण सकाळी उठल्यावर पहिल्यांदा कोणाला नमस्कार करतो माहितीये? आई-बाबा, बायको, नवरा, मुलं… हे सगळं बाजूलाच ठेवा. पहिला नमस्कार मोबाईलला होतो.

WhatsApp, Instagram, Reels, YouTube Shorts… एकदा हातात फोन घेतला की कधी दोन तास उडून जातात कळतही नाही. मग संध्याकाळी बसून ओरडतो, “आज काहीच काम झालं नाही म्हणून”.

पण खरं सांगू? मोबाईल कमी वापरायचा आणि Productive व्हायचं हे काही रॉकेट सायन्स नाही. काही छोटे-छोटे बदल केले तर आयुष्य खरंच छान बनतं. चला तर मग मोबाईलवरचा वेळ कमी करून Productive कसं व्हायचं? ते जाणून घेऊ.

“फालतू अॅप्स” ला रामराम करा

मोबाईलमध्ये आपण किती अॅप्स टाकलेले असतात माहितीये का? Instagram, Facebook, YouTube, Games… असं बघितलं तर अर्धा फोन “फालतू अॅप्स”नी भरलेला असतो.

आता खरं सांगू हे अॅप्स वाईट नाहीत हो, पण त्यांचं काम फक्त आपल्याला खेचून घेणं आहे . Notification आली की आपोआप हात फोनकडे जातो आणि उगाच वेळ फुकट होतो.

म्हणून एकदा तुमच्या फोनचं “Screen Time” check करा. दिवसभरात किती तास Instagram, YouTube वर गेले हे पाहिलं की डोकं फिरतं! मग लगेच useless अॅप्स uninstall करा.

आणि हो, नुसता delete करून दोन दिवसांनी Play Store वरून परत install करू नका बरं का? ज्याचा खरंच उपयोग आहे फक्त तेवढंच ठेवा. बाकी सगळ्यांना रामराम करा.

हे पण वाचा: वेळेचं नियोजन (Time Management) कसं करायचं?

Notification बंदच ठेवा

फोन सतत टुणटुण करत राहिला की मनाला healthy शांतता मिळते का? नाहीच! आपण नकळत फोन उचलतोच. WhatsApp वर मेसेज आलाय का, Instagram वर कुणी photo ला like केलं का… असं बघताना वेळ चक्क उडून जातो.

उपाय अगदी सोपा आहे. Setting मध्ये जा आणि notification ला stop करा. फक्त कामाचे apps (जसे बँकिंग, ऑफिस apps) यांचीच notification चालू ठेवा. बाकीचं सगळं बंदच करून ठेवा.

हे एक केलं की लगेच फरक जाणवेल. फोन शांत बसला की मनही शांत होतं. आपण कुठं काय करतोय त्यात जास्त focus करता येतं.

वेळेची मर्यादा ठेवा

मोबाईल म्हणजे bottomless खड्डा आहे. Reels बघायला बसलो की “फक्त ५ मिनिटं” म्हणतो आणि तास-दीड तास निघून जातो. मग शेवटी guilt लागतो की “आज पुन्हा काही कामाचं नाही झालं!”

म्हणून नियम करा, Instagram दिवसातून फक्त ३० मिनिटे वापरायचा . YouTube जास्तीत जास्त १ तास वापरायचा. WhatsApp फक्त reply च्या वेळीच वापरायचा, उगाच दिवसभर chat नाही. आणि तसंच Facebook सुद्धा.

ही मर्यादा ठेवल्यावर दोन फायदे होतात. एक म्हणजे वेळ वाचतो, दुसरं म्हणजे मनातल्या मनात “आज मी माझा rule पाळलाय” असं म्हणताना भारी feel येतो.

सकाळचा पहिला तास मोबाईलशिवाय घाला

सकाळी उठल्या उठल्या जर मोबाईल हातात घेतला तर झालं! WhatsApp वरचे मेसेज, Instagram वरचे photos, YouTube वरचं काहीतरी random video… आणि अजून डोळे नीट उघडायचे बाकी असतानाच मेंदू overload होतो. दिवसाची सुरुवातच गोंधळात होते.

त्यापेक्षा काय करा. उठल्या उठल्या एक ग्लास कोमट पाणी प्या. शरीराला fresh वाटतं. थोडं चालून या किंवा खिडकीजवळ उभं राहून ताजी हवा घ्या.

एक छोटी वही किंवा notepad काढा आणि “आज मला काय-काय करायचं आहे?” याची यादी लिहा.

हा पहिला तास मोबाईलशिवाय productive गेला तर दिवस खरंच मस्त जातो. कारण दिवसाची सुरुवात जर positive केली तर नंतर कामं कितीही जड असली तरी मन भारी ठेवतं.

जास्त Reels पाहू नका

बघा मंडळी, Reels म्हणजे “time पासचा जाळा” आहे. आपण म्हणतो “फक्त ५ मिनिटं बघतो”… पण काय होतं? पाच मिनिटं पंधरा होतात, पंधरा अर्धा तास, आणि अर्धा तास तासभरात बदलतो. मग शेवटी स्वतःलाच वाटतं. “आजचा तास तर Reels खात गेला रे बाबा!”

एकदा experiment करा. Instagram, Facebook किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्म वरील Reels पाहुच नका. पहिल्या-दुसऱ्या दिवशी हात रिकामे वाटतील, सवय लागलेली असते ना!

पण थोड्या दिवसांनी जाणवेल की जग थांबलं नाहीये, उलट तुमच्याकडे जास्त वेळ कामं करण्यासाठी आहे.

म्हणजेच Reels ला breakup letter लिहा. “प्रिय Reels, आता तुझ्यासोबत राहणं माझ्यासाठी शक्य नाही. तू माझा वेळ खातेयस. Bye!” असं सुद्धा लिहू शकता. (just joking)

हे पण वाचा: जीवनात शिस्त (Discipline) आणण्याचे सोपे मार्ग

मोबाईल ऐवजी कागद वापरा

आजकाल प्रत्येक गोष्टीसाठी app आहे. To-do list, Notes, Reminders… पण जास्त app वापरलं की screen time वाढतोच. त्यापेक्षा कधी pen-paper वापरून बघा.

करायचं काम असेल तर डायरीत लिहा. डोक्यात छानसा idea आला तर वहीत note करा. दिवसाच्या शेवटी tick mark करताना एकदम मस्त feel येतो.

Pen आणि paper ला एक वेगळी जादू आहे. त्यात technology नाही, पण simplicity आहे. Screen वर swipe केल्यापेक्षा पानावर tick mark करणं जास्त satisfying असतं. शिवाय मेंदूही refresh होतो.

“Offline ची मजा” परत आणा

आधीच्या काळात बगीतल तर… लोकांना भेटायला जायचो, गप्पा मारायचो, चहा टाकून एकत्र बसायचो. मोबाईल, इंटरनेट नव्हतं तरी लोकांना मजा कमी वाटली नाही. आज मात्र situation उलटं झाली आहे. सगळेच फोनच्या screen मध्ये busy आहेत.

म्हणून कधी तरी मित्रांना खऱ्या अर्थाने भेटा. एखादा cricket match खेळा, antakshari करा किंवा बाहेर फेरफटका मारा. घरातल्या लोकांशी बसून गप्पा मारा. तुम्हाला विश्वास बसणार नाही. आपल्या आई-बाबा किंवा मुलं किती मजेशीर गोष्टी सांगतात. आणि हो, एक चहा करून गप्पा मारल्या की ते social media पेक्षा १० पट जास्त मजेदार असतं.

Offline मजा परत आणली की समजून घ्या. मोबाईलचा ताबा कमी झाला आहे.

मोबाईल ठराविक जागी ठेवा

मोबाईल आपल्यासोबत २४ तास चिकटलेला असतो. झोपताना उशाशी, जेवताना हातात, चालताना खिशात… म्हणजे फोनचं नाव बदलून “सावली” ठेवलं तरी चालेल,एवढा तर ते आपल्या सोबत राहतो.

पण सत्य तर हेच आहे,सतत डोळ्यासमोर असेल तर तो उचलल्याशिवाय राहवत नाही. जेवताना मोबाईल दुसऱ्या खोलीत ठेवा. जेवणातल्या चवीत जास्त मजा येते.

झोपताना मोबाईल बेडपासून लांब ठेवा. नाहीतर झोपायच्या ऐवजी रात्रभर scrolling चालूच राहते. काम करताना मोबाईल silent mode मध्ये ठेवा. सतत टुणटुण वाजलं की concentration उडतं.

असं केल्याने मोबाईल आपोआप दूर राहतो आणि वेळ वाया जाणं कमी होतं.

हे पण वाचा: सोशल मीडिया आपले जीवन कसा बदलतो? फायदे आणि तोटे

मोबाईलवरून शिकण्याचा वापर करा

मोबाईल स्वतः वाईट नाही. उलट तो एक मोठं साधन आहे. फक्त चुकीचा वापर आपल्याला आळशी बनवतो.

YouTube वर study-related videos बघा. नवीन skill शिका. coding, cooking, yoga काहीही. Podcasts ऐका. गप्पा मारता मारता किती छान गोष्टी शिकायला मिळतात. E-books वाचा. एक chapter वाचलात तरी मेंदूला knowledge मिळतं.

यामुळे दोन फायदे, एक म्हणजे, मोबाईल वापरल्यावर guilt येत नाही. दुसरं म्हणजे, तुम्ही खरंच productive आहात असं वाटतं.

मोबाईल वाया घालवणं थांबवून, शिकण्यासाठी वापरला तर तो “timepass machine” न राहता “knowledge machine” बनतो.

थोडं “Digital Detox” करा

मोबाईल म्हणजे आपला best friend कमी worst enemy जास्त आहे. मित्र म्हणून तो उपयोगी पडतो. कधी study करायला, कधी काम करायला, कधी entertainment ला. पण शत्रू म्हणून काय करतो? वेळ खातो, डोळे थकवतो, झोप उडवतो आणि एकदम उगाच चिडचिड करायला लावतो.

म्हणून आठवड्यातून निदान एक दिवस मोबाईलला बाजूला ठेवा. मित्र-मैत्रिणींसोबत एखादी पिकनिक प्लॅन करा. त्या दिवशी फोटो काढायला मोबाईल वापरला तरी social media वर टाकायचं नाही, direct मजा घ्या.

घरात बसून कुटुंबासोबत बोर्ड गेम्स खेळा. Ludo, Carrom, Antakshari ह्याच गोष्टी खरी मजा देतात. एखाद्या शांत ठिकाणी चक्कर मारून या. ताजी हवा, हिरवीगार झाडं आणि मोबाईलविना फिरणं हे एकदम refresh करतं.

पहिल्यांदा detox केलंत तर हात रिकामे वाटतील, पण हळूहळू लक्षात येईल कि, “मोबाईलशिवायही आयुष्य खूप सुंदर आहे.

निष्कर्ष :

मोबाईल हा शत्रू नाही. उलट तो एक मोठं साधन आहे. पण फरक एवढाच कि, आपण त्याला control करायचं, की तो आपल्याला control करणार? हे आपण ठरवलं पाहिजे.

मंडळी वेळ खूप महत्वाचा आहे. वेळ वाया घालवू नका. वेळेचं नियोजन करा आणि वेळेचं भान ठेवा. फालतू apps काढून टाका, offline आयुष्याची खरी मजा घ्या.

हे केलंत तर मोबाईल तुमचं जीवन खाणार नाही, उलट तुमचं जीवन Productive आणि सुखी बनवेल.
मग समजून घ्या. हेच तुमचं नवीन normal जीवन आहे!

तुम्ही दररोज मोबाईलवर किती तास घालवता? खाली comment मध्ये नक्की लिहा! आणि हा लेख आवडला असेल तर share करून कुणाचं आयुष्यही Productive बनवा.”

FAQ :

1. मोबाईल पूर्णपणे वापरणं बंद करावं का?

नाही रे बाबा! मोबाईल उपयोगाचा आहे. पण वापरावर control करायला हवं.

2. मुलं जास्त मोबाईल वापरत असतील तर काय करावं?

त्यांना खेळ, कला, अभ्यासात busy ठेवा. Role model व्हा.

3. मोबाईल कमी केल्याने काय फायदा होतो?

मन शांत राहतं, डोळ्यांना आराम मिळतो, झोप सुधारते, आणि कामं जास्त होतात.

हे पण वाचा: छोट्या सवयी बदलून आयुष्य कसं सुधारू शकतो?

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Sharing Is Caring:

मी कोण आहे?तर मी गेल्या काही वर्षापासून स्वतःवर काम करत आहे.स्व-उन्नती(Self Improvement), सकारात्मक विचार, वेळेचं व्यवस्थापन, यशस्वी सवयी आणि शांत मन या गोष्टी मी स्वतः अनुभवून शिकल्या आहेत. या प्रवासात जे काही मला उपयोगी वाटलं, जे खरंच तुमच आयुष्य बदलेल. तेच मी इथं लिहतो.माझं एकच उद्दिष्ट आहे कि, "सोप्या शब्दात प्रेरणा देणं आणि लोकांच्या आयुष्यात छोटा का होईना, पण सकारात्मक बदल घडवणं." माझे लेख अनुभव, अभ्यास आणि रोजच्या जीवनात वापरता येतील अशा सवयींवर आधारित असतात. माझा विश्वास आहे कि,प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्याची एक संधी असतो.

Leave a Comment

Verified by MonsterInsights