स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय: मित्रांनो, तुमच्या सोबत कधी अस होतं का…? कि हातातच घरची चावी घेऊन घरभर फिरता आणि स्वतःलाच विचारता, “अरे… ही किल्ली मी कुठे ठेवली?”किंवा दुकानात जाऊन निम्म्या गोष्टी विसरून परत येता? असं झालं की आपल्याला वाटतं ,“अरे, माझं डोकं काही कामाचं राहिलं नाही!”

पण मित्रांनो तुम्हाला खरी गोष्ट सांगू? तुमचं डोकं अगदी ठीक आहे. फक्त त्याला थोडं प्रेम, थोडा पोषण आणि थोडा व्यायाम हवा आहे. औषधाच्या बाटल्या, महागडं टॉनिक घेण्याची अजिबात गरज नाही. आपल्या घरातच असे उपाय आहेत की मेंदू जास्त दिवस तल्लख राहील आणि आठवण पक्की होईल.

चला तर मग पाहूया स्मरणशक्ती वाढवण्यासाठी असे 5 सोपे घरगुती उपाय जे तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास नक्कीच मदत करतील.

बदामाचं दूध

बदामाचं दूध हे जणू मेंदूचा बेस्ट फ्रेंड आहे. आपल्या आजीला विचाराल तर ती म्हणेल, “बाळा, बदाम खा, डोकं चालेल.” हे काही फक्त जुन्या लोकांच्या गोष्टी नाहीत; तर विज्ञानानेही हे मान्य केलं आहे. बदामात व्हिटॅमिन ई आणि ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स असतात जे मेंदूच्या पेशी मजबूत करतात.

काय करायचं:

  • रात्री 6-7 बदाम पाण्यात भिजवा.
  • सकाळी त्याची साल काढून मिक्सरमध्ये दूध घालून वाटा.
  • रोज रिकाम्या पोटी प्या.

दोन आठवड्यांत फरक जाणवायला लागतो एकाग्रता वाढते आणि लहानसहान गोष्टी पटकन आठवतात. हे विद्यार्थ्यांसाठी आणि सतत मानसिक मेहनत घेणाऱ्यांसाठी खास फायदेशीर आहे.

हे पण वाचा: अभ्यासासाठी उत्तम टाइम टेबल कसे बनवावे? वेळेचे नियोजनाचे 8 सोपे टप्पे

हळदीचं दूध

हळद ही फक्त जखम बरी करणारी नाही तर मेंदूतील सूज कमी करणारी आणि नवीन पेशी निर्माण करणारी आहे. हळदीमधील कर्क्युमिन स्मरणशक्ती सुधारण्यासाठी ओळखला जातो.

काय करायचं:

  • रात्री झोपण्याआधी कोमट दुधात अर्धा चमचा हळद मिसळा.
  • हवं तर थोडं मध टाकू शकता.
  • आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या.

हळदीच्या दुधामुळे रात्री चांगली झोप लागते, आणि दुसऱ्या दिवशी डोकं फ्रेश वाटतं आणि तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी किंवा पद्धतीने जाते. झोप आणि आठवण दोन्ही सुधारतं

तूप

शुद्ध गायीचं तूप हे मेंदूसाठी इंधनासारखं आहे. शरीराला जशी एनर्जी लागते, तशीच मेंदूला हेल्दी फॅट लागते.शुद्ध गायीचं तूप हे ब्रेन सेल्ससाठी आवश्यक चांगलं फॅट पुरवतं. ते मेंदूचे न्यूरॉन्स सक्रिय ठेवतं आणि एकाग्रता वाढवतं.

काय करायचं:

  • सकाळी गरम पोळी किंवा भाकरीवर १ चमचा तूप लावा.
  • हवं तर दुधात घालूनही पिऊ शकता.

मित्रांनो तूप हे आपल्या मेंदूतील न्यूरॉन्सना बळ मिळतं आणि अभ्यास, कामात एकाग्रता वाढवते.

तुळशीची पाने

तणाव हा मेंदूच्या कार्याचा मोठा शत्रू आहे. तुळशीतील नैसर्गिक गुणधर्म तणाव कमी करतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. तुळशीतील नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स तणाव कमी करून मेंदूचं कार्य सुधारतात.

काय करायचं:

  • सकाळी ५-६ तुळशीची ताजी पानं स्वच्छ धुऊन खा.
  • किंवा तुळशीचा चहा प्या.

तणाव कमी झाला की विचार करण्याची ताकद आपोआप वाढते.हे एकाचवेळी रोगप्रतिकारशक्तीही वाढवतं.

मेंदूला व्यायाम

फक्त खाण्याने स्मरणशक्ती वाढत नाही, मेंदूला काम देणंही तितकंच महत्त्वाचं आहे जितक कि आपण पेरणीच्या वेळेत बैलाला काम देतो. मेंदूचा वापर न केल्यास तो आळशी होतो. रोज त्याला काम द्या.जसं शरीराला व्यायाम लागतो तसंच मेंदूलाही वर्कआउट लागतो.

काय करायचं:

  • पझल्स, शब्दकोडे, सुडोकू खेळा.
  • दररोज १५ मिनिटं पुस्तक वाचा आणि त्यातलं लक्षात ठेवायचा प्रयत्न करा.
  • नवीन रेसिपी, गाणं किंवा भाषा शिका.

मेंदू जितका काम करेल तितका तो तल्लख राहील.

अजून दोन गोष्टी विसरू नका

  1. पुरेशी झोप: ७-८ तास झोप ही मेंदूसाठी औषधासारखी आहे.
  2. पाणी प्या: डिहायड्रेशनमुळे मेंदू थकतो. दिवसाला किमान ७-८ ग्लास पाणी प्या.

निष्कर्ष :

ही सगळी माहिती पुस्तकातली किंवा इंटरनेटवरची थंड शब्दं नाहीत. हे उपाय आपल्या घरातल्या ज्येष्ठांनी, आज्यांनी, आईवडिलांनी वर्षानुवर्षं करून पाहिलेले आहेत. फरक दिसतोय म्हणूनच ते पिढ्यान्पिढ्या सांगितले जात आहेत. तुम्ही फक्त एक आठवडा करून पाहा,फरक जाणवेल.

जर तुम्ही याशिवाय दुसरे काही खास उपाय करत असाल तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा.

Disclaimer: या लेखातील माहिती ही केवळ सामान्य ज्ञानासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला मानू नये. कोणत्याही घरगुती उपायांचा वापर करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

1. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी घरगुती उपाय किती दिवसात परिणाम देतात?

घरगुती उपाय हे नैसर्गिक असल्यामुळे त्यांना थोडा वेळ लागतो. साधारण २-३ आठवडे नियमित केल्यास फरक जाणवू लागतो. मात्र, दीर्घकाळ सातत्य ठेवल्यास परिणाम जास्त चांगले दिसतात.

2. फक्त बदामाचं दूध पिण्यानेच स्मरणशक्ती वाढेल का?

बदामाचं दूध स्मरणशक्ती सुधारण्यात मदत करतं, पण त्यासोबत पुरेशी झोप, तणाव कमी करणं, आणि मेंदूचा व्यायाम हेही महत्त्वाचे आहेत. फक्त एकाच उपायावर अवलंबून राहू नका.

3. हळदीचं दूध रोज घेणं सुरक्षित आहे का?

हो, हळदीचं दूध रोज घेणं सुरक्षित आहे. मात्र, ज्यांना हळदीची अ‍ॅलर्जी आहे किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

4. मेंदूचा व्यायाम म्हणजे नेमकं काय?

मेंदूचा व्यायाम म्हणजे मेंदूला नवे व अवघड काम देणं.पझल्स सोडवणं, नवीन भाषा शिकणं, पुस्तकातील गोष्टी लक्षात ठेवणं, किंवा मेंदूला विचार करायला लावणारे खेळ खेळणं.

5. लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हे उपाय चालतील का?

हो, पण लहान मुलांना देताना प्रमाण कमी ठेवा. उदा. बदामाचं दूध कमी प्रमाणात, तुपाचं अर्धा चमचा, हळदीचं दूध थोड्या प्रमाणात.

हे पण वाचा: मोबाइलमुळे लक्ष हरवतंय? अभ्यासात लक्ष मिळवण्यासाठी 7 सोपे टिप्स जाणून घ्या !

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Sharing Is Caring:

मी कोण आहे?तर मी गेल्या काही वर्षापासून स्वतःवर काम करत आहे.स्व-उन्नती(Self Improvement), सकारात्मक विचार, वेळेचं व्यवस्थापन, यशस्वी सवयी आणि शांत मन या गोष्टी मी स्वतः अनुभवून शिकल्या आहेत. या प्रवासात जे काही मला उपयोगी वाटलं, जे खरंच तुमच आयुष्य बदलेल. तेच मी इथं लिहतो.माझं एकच उद्दिष्ट आहे कि, "सोप्या शब्दात प्रेरणा देणं आणि लोकांच्या आयुष्यात छोटा का होईना, पण सकारात्मक बदल घडवणं." माझे लेख अनुभव, अभ्यास आणि रोजच्या जीवनात वापरता येतील अशा सवयींवर आधारित असतात. माझा विश्वास आहे कि,प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्याची एक संधी असतो.

Leave a Comment

Verified by MonsterInsights