अभ्यासासाठी उत्तम टाइम टेबल कसे बनवावे? वेळेचे नियोजनाचे 8 सोपे टप्पे

अभ्यासासाठी उत्तम टाइम टेबल कसे बनवावे? वेळेचे नियोजनाचे 8 सोपे टप्पे: “वेळ गेली की परत येत नाही” ही जुनी म्हण आपण अनेकदा ऐकतो. तसेच, माझ्याकडे वेळच उरत नाही” हे वाक्य हल्ली प्रत्येक विद्यार्थ्याच्या तोंडी असलेलं एक सार्वत्रिक कारण बनलं आहे. दिवसाचे 24 तास हे सर्वांसाठी समान आहेत, पण काही विद्यार्थी त्या वेळेत अभ्यास, झोप, छंद, वाचन, आणि स्वतःसाठी वेळ काढतात… तर काहींना Instagram scroll करूनही वेळ पुरेसा वाटत नाही!

जर तुमच्या सोबतही असं घडत असेल तर तुमचं वेळेचं नियोजन योग्य नाही.वेळेचे योग्य नियोजन करणे हे कोणत्याही विद्यार्थ्यासाठी यशाची गुरुकिल्ली आहे. पण बऱ्याचदा आपल्या सोबत असं होतं की आपण मोठ्या उत्साहात टाइम टेबल बनवतो, पण दोन-चार दिवसांतच तो पाळणं शक्य होत नाही.

मोबाइलमुळे लक्ष हरवतंय? किंवा अभ्यास करताना खूप झोपच लागते! अशा प्रकारची कारणे आजकालचा प्रत्येक विद्यार्थी देतो. आणि याचा परिणाम म्हणून, वेळेचं नियोजन करणं म्हणजे एक कठीण काम आहे, असं आपल्याला वाटू लागतं. पण खरं सांगायचं तर, टाइम टेबल बनवणं आणि तो पाळणं हे अजिबात कठीण नाही. फक्त काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

आज आपण पाहणार आहोत की अभ्यासासाठी एक असा टाइम टेबल कसा बनवायचा, जो तुमच्यासाठी सोयीचा असेल आणि तुम्ही तो नियमितपणे पाळू शकाल.

1. स्वतःला ओळखा: तुमची सर्वोत्तम वेळ कोणती?

टाइम टेबल बनवण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला ओळखणे. तुम्ही सकाळी लवकर उठून अभ्यास करणारे आहात की रात्री उशिरापर्यंत जागून अभ्यास करणारे आहात? काही लोकांना सकाळी शांत वातावरणात अभ्यास करायला आवडतं, तर काही जणांना रात्रीची शांतता जास्त फायदेशीर वाटते. तुमच्या सोयीनुसार अभ्यासाची वेळ ठरवा.

प्रत्येकाची Peak Productivity वेळ वेगळी असते.तुमचा peak time अभ्यासासाठी वापरा.बाकी कामं त्या वेळेत टाकू नका. तुम्ही सर्वात जास्त एकाग्र कधी असता, हे ठरवा आणि त्या वेळी तुमच्यासाठी सर्वात कठीण विषय घ्या.

2. तुमच्या विषयांची यादी बनवा

तुमच्याकडे किती विषय आहेत आणि त्यापैकी कोणते विषय कठीण आहेत, याची एक यादी बनवा. प्रत्येक विषयासाठी किती वेळ द्यायचा आहे, हे ठरवा. उदाहरणार्थ, जर गणित तुम्हाला कठीण वाटत असेल, तर त्यासाठी रोज जास्त वेळ द्या. सोप्या विषयांसाठी कमी वेळ दिला तरी चालेल.

3. मोठ्या कामाचे छोटे भाग करा

जर तुम्हाला ‘गणित’ विषयातील एखादं प्रकरण पूर्ण करायचं असेल, तर ते एकाच दिवशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी, त्याचे छोटे भाग करा. उदाहरणार्थ:

  • सोमवार: गणिताचे पहिले सूत्र वाचा.
  • मंगळवार: त्या सूत्रावर आधारित उदाहरणे सोडवा.
  • बुधवार: आणखी काही अवघड उदाहरणे सोडवा. असं केल्याने काम सोपं वाटतं आणि तुम्ही निराश होत नाही.
  • तसेच तुम्हाला अभ्यासाची गोडी पण लागेल.

4. ब्रेक (Break) घेणे विसरू नका

सलग अनेक तास अभ्यास करणे हे फारसे प्रभावी नसते. यामुळे मेंदू थकून जातो आणि एकाग्रता कमी होते. म्हणून,प्रत्येक 40-50 मिनिटांनंतर 10-15 मिनिटांचा छोटा ब्रेक घ्या. या ब्रेकच्या वेळी थोडं चाला, पाणी प्या, किंवा थोडं बाहेर डोकावून बघा. यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि तुम्ही पुन्हा नव्या जोमाने अभ्यास सुरू करू शकता.

5. झोप आणि विश्रांतीला महत्त्व द्या

मित्रांनो, आपल्या शरीराला आणि चांगल्या अभ्यासासाठी पुरेशी झोप खूप महत्त्वाची आहे. रात्रीची 7-8 तासांची शांत झोप घेतल्यास तुमचा मेंदू दुसऱ्या दिवशीच्या अभ्यासासाठी तयार होतो. तुमच्या टाइम टेबलमध्ये झोपेसाठी आणि मनोरंजनासाठीही वेळ ठेवा. फक्त अभ्यासच नाही, तर खेळ, व्यायाम आणि छंद यांसाठीही थोडा वेळ देणे आवश्यक आहे.एका दिवसात 10-12 तास अभ्यास करण्याची गरज नाही. थोडं कमी पण नियमित आणि समजून अभ्यास करणं अधिक फायदेशीर ठरतं.

6. टाइम टेबल लवचिक (Flexible) ठेवा

तुमचा टाइम टेबल दगडावरची रेघ नाही. कधीतरी काही कारणांमुळे वेळापत्रक पाळता येत नाही. अशा वेळी निराश होऊ नका. तो वेळ पुढच्या दिवशी ऍडजेस्ट करा. तुमचा टाइम टेबल थोडा लवचिक ठेवा. यामुळे तुम्हाला त्यावर जास्त ताण येणार नाही.

हे पण वाचा: मोबाइलमुळे लक्ष हरवतंय? अभ्यासात लक्ष मिळवण्यासाठी 7 सोपे टिप्स जाणून घ्या !

7. तुम्ही केलेल्या प्रगतीचे मोजमाप करा

प्रत्येक आठवड्याच्या शेवटी ‘रिव्हिजन’साठी वेळ ठेवा. ज्यामुळे आठवडाभर काय शिकलात ते पुन्हा लक्षात राहते.आठवड्याच्या शेवटी तुम्ही ठरवलेल्या उद्दिष्टांपैकी किती पूर्ण केले, याचा आढावा घ्या. तुम्ही कुठे कमी पडत आहात आणि कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, हे यामुळे कळेल. स्वतःला शाबासकी द्या आणि चुकांमधून शिका.

8. डिजिटल टूल्स आणि अॅप्सचा वापर करा

आजकाल अनेक डिजिटल टूल्स आणि अॅप्स उपलब्ध आहेत, जे तुम्हाला टाइम टेबल बनवण्यात आणि त्याचं पालन करण्यात मदत करतात. उदाहरणार्थ, Google Calendar, किंवा Notion यासारखी अॅप्स तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन करायला मदत करतात. या अॅप्समध्ये तुम्ही तुमचे टाइम टेबल सेट करू शकता, रिमाइंडर्स लावू शकता आणि तुमच्या प्रगतीचा आढावा घेऊ शकता.

टाइम टेबल बनवताना या 7 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात :

1. Flexibility ठेवा – एखादा विषय समजायला वेळ लागला तर उर्वरित वेळ त्याला द्या.

2. आरोग्याची काळजी घ्या – अन्न, झोप आणि विश्रांती यालाही वेळ द्या.

3. मोबाईलचा मर्यादित वापर करा – सोशल मिडिया टाळा किंवा विशिष्ट वेळेवरच वापरा.

4. Reward System ठेवा – ठरवलेलं काम पूर्ण केल्यावर स्वतःला एखादा छोटा गिफ्ट द्या.

5. टारगेट ठरवा – प्रत्येक आठवड्यासाठी एक लक्ष्य ठेवा.

6. संकटांची तयारी ठेवा – अचानक आलेल्या अडचणीसाठी काही buffer(अडचणीसाठी राखून ठेवलेला अतिरिक्त वेळ) ठेवा.

7. स्वत:ची चाचणी घ्या – वेळोवेळी स्वतःचा अभ्यास मोजा, चुका शोधा.

टाइम टेबल बनवण्याचे काय फायदे आहेत :

  • एकाग्रता वाढते
  • संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण होतो
  • स्वत:वर नियंत्रण ठेवता येते
  • तणाव कमी होतो
  • स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता वाढते
  • अभ्यास करण्याची गोडी अधिक वाढते

उदाहरण, टाइम टेबल (10वी-12वी विद्यार्थ्यांसाठी) :

वेळकाय कराल?
5:30 ते 6:00उठणे आणि ध्यान / प्रार्थना
6:00 ते 7:30महत्त्वाचा विषय (Maths / Science)
7:30 ते 8:30आंघोळ, नाश्ता, शाळेची तयारी
8:30 ते 1:30शाळा / कॉलेज
1:30 ते 2:30जेवण आणि विश्रांती
2:30 ते 4:00गृहपाठ आणि Revision
4:00 ते 5:00खेळ / व्यायाम
5:00 ते 6:00नवीन विषय / वाचन
6:00 ते 7:00टीव्ही / मोबाईल (मर्यादित वेळ)
7:00 ते 8:00रात्रीचे जेवण
8:00 ते 9:30Test solving / Revision
9:30 ते 10:00 झोपेची तयारी
अशा प्रकारे तुमच्या वेळेनुसार timetable बनवू शकता.

निष्कर्ष :

वेळेचे नियोजन करणे म्हणजे स्वतःला कोणत्यातरी बंधनात बांधून घेणे नाही. उलट, हे एक असे साधन आहे, जे तुम्हाला तुमच्या वेळेचा सर्वोत्तम वापर करण्याची संधी देते. एक चांगला टाइम टेबल तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करतो, तणाव कमी करतो आणि अभ्यासाची गुणवत्ता सुधारतो.

तुमचा टाइम टेबल कसाही असो, सर्वात महत्त्वाचं आहे की तुम्ही तो मनापासून पाळायला सुरुवात करा. तुमच्या चुका ओळखा, त्यातून शिका आणि गरजेनुसार तुमच्या टाइम टेबलमध्ये योग्य ते बदल करा. योग्य नियोजनाने, तुम्ही तुमच्या अभ्यासाची गती वाढवू शकता आणि अपेक्षित यश नक्कीच मिळवू शकता.

तुमचा टाइम टेबल कसा असावा ? याबद्दल तुमचा अनुभव काय आहे ? कमेन्ट मध्ये नक्कीच सांगा.

डिस्क्लेमर: वरील माहिती केवळ शैक्षणिक आणि सामान्य मार्गदर्शनासाठी दिली आहे. कृपया कोणतीही वैयक्तिक किंवा वैद्यकीय अडचण असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

FAQ :

1. मी टाइम टेबल तयार केलं पण पाळू शकलो नाही, काय करू?

आधी लहान लहान बदलांनी सुरुवात करा. अचानक 6 तास अभ्यास करणे शक्य नाही. दररोज 1 तास, मग 2 तास असे वाढवा.

2. मोबाईलचे व्यसन आहे, काय उपाय?

अभ्यासाच्या वेळेस मोबाईल airplane mode वर ठेवा. Study Apps वापरण्यासाठी वेळ ठरवा आणि पालकांची मदत घ्या.

3. अभ्यास कंटाळवाणा वाटतो, काय करू?

वेळोवेळी विषय बदला, ग्रुप स्टडी करा, प्रश्नमंजुषा (quizzes) सोडवा आणि rewards system वापरा.

हे पण वाचा: स्वतःवर प्रेम करण्याचा सगळ्यात सोपा आणि खरा मार्ग: 9 सवयी ज्या तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलतील

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Sharing Is Caring:

मी कोण आहे?तर मी गेल्या काही वर्षापासून स्वतःवर काम करत आहे.स्व-उन्नती(Self Improvement), सकारात्मक विचार, वेळेचं व्यवस्थापन, यशस्वी सवयी आणि शांत मन या गोष्टी मी स्वतः अनुभवून शिकल्या आहेत. या प्रवासात जे काही मला उपयोगी वाटलं, जे खरंच तुमच आयुष्य बदलेल. तेच मी इथं लिहतो.माझं एकच उद्दिष्ट आहे कि, "सोप्या शब्दात प्रेरणा देणं आणि लोकांच्या आयुष्यात छोटा का होईना, पण सकारात्मक बदल घडवणं." माझे लेख अनुभव, अभ्यास आणि रोजच्या जीवनात वापरता येतील अशा सवयींवर आधारित असतात. माझा विश्वास आहे कि,प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्याची एक संधी असतो.

Leave a Comment

Verified by MonsterInsights