स्वतःवर प्रेम करण्याचा सगळ्यात सोपा आणि खरा मार्ग: 9 सवयी ज्या तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलतील : आपण आपल्या आयुष्यात अनेकांवर प्रेम करतो. जसं कि, आई-वडील, मित्र, जोडीदार, मुलं… पण एक व्यक्ती जी नेहमी आपल्यासोबत असते,पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो ते म्हणजे आपण स्वतः! मग आपण स्वतःवर प्रेम करणं तेवढंच गरजेचं आहे, जितकं प्रेम आई-वडील यांवर करतो. स्वतःवर प्रेम करणे ही एक कला आहे.
सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात अनेकदा आपण स्वतःला विसरून जातो. इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात, कामाच्या ओझ्याखाली दबून किंवा भविष्याच्या चिंतेत आपण इतके गुंतून जातो की स्वतःकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळच मिळत नाही. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा: जोपर्यंत तुम्ही स्वतःवर प्रेम करत नाही, तोपर्यंत तुम्ही इतरांना खरे प्रेम देऊ शकत नाही किंवा जीवनात खरा आनंद अनुभवू शकत नाही. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वार्थीपणा नव्हे, तर ते आपल्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
या लेखात आपण दररोज स्वतःवर प्रेम करण्याचे 9 सोपे उपाय जाणून घेणार आहोत, जे तुमच्या दैनंदिन जीवनात सहज लागू करू शकता. हे उपाय तुम्हाला स्वतःशी जोडण्यात आणि स्वतःला प्राधान्य देण्यात मदत करतील.
1. स्वतःची काळजी घ्या
मित्रांनो, या धावपळीच्या जीवनामध्ये आपण आपली स्वतःची काळजी घेणे जणू सोडूनच दिले आहे. स्वतःची काळजी न घेता आपण इतरांची काळजी जास्त घेतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या कि, स्वतःवर प्रेम करण्याचा पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःची शारीरिक आणि मानसिक काळजी घेणे. याचा अर्थ केवळ आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जाणे नव्हे, तर दररोज स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देणे होय.
एक वेळ अशी पण येईल आणि तुम्हाला कळेल कि, या जगात स्वतःवर प्रेम करणे, हेच खूप महत्वाचे आहे. इतरांवर पण प्रेम करा,पण सर्वात आधी स्वतःवर प्रेम करायला शिका किंवा स्वतःला प्राधान्य द्या.
2. आरोग्याची काळजी घ्या
स्वतःवर प्रेम करणे तर महत्वाचे आहेच पण त्याच बरोबर आपल्या आरोग्याची काळजी घेणे पण अत्यंत महत्वाचे आहे. कारण जर तुमचं आरोग्य निरोगी आणि तर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी अत्यंत चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. तर मग आता तुम्ही आरोग्याची काळजी कशी घ्याल ? चला तर मग जाणून घेऊ, सर्वात आधी सकाळी लवकर उठा कारण सकाळी लवकर उठल्याने आपल्याला खूप टाइम स्वतःसाठी मिळतो त्याचबरोबर मन सुद्धा अगदी शांत राहते.
सकाळी लवकर उठल्यावर कोमट पाणी प्या,कोमट पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातील विषारी द्रव्यांची (toxins) साफसफाई होते. त्यानंतर ध्यान (Meditation) करा,व्यायाम (Exercise) करा आणि पौष्टिक अन्न खा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात करा.
3. शारीरिक आरोग्याची काळजी घ्या
स्वतःवर प्रेम करणं म्हणजे तुमच्या शरीराचीही काळजी घेणं होय. तुमचं शरीर हाच तुमचा आधार आहे, आणि त्याला निरोगी ठेवणं ही स्वतःवर प्रेम करण्याची पहिली पायरी आहे. तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळं आणि प्रथिनं यांचा समावेश करा.
जंक फूड कमी करा आणि पाणी भरपूर प्या. दररोज किमान 30 मिनिटं व्यायाम करा. यात चालणं, योगा, किंवा जिममधलं वर्कआउट यापैकी काहीही असू शकतं.रात्री 7-8 तासांची पुरेशी झोप घ्या. यामुळे तुमचं मन आणि शरीर ताजंतवानं राहील.निरोगी शरीरातच निरोगी मन वास करतं, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराची काळजी घेता, तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटतं.
(हे पण वाचा: सकाळची चांगली सवय: यशस्वी लोक सकाळी काय करतात? )
4. स्वतःला माफ करा
“माणूस हा चुकीचा पुतळा आहे.” हे वाक्य तुम्ही कधी न कधी नक्कीच एकले असेल. आणि हे वाक्य अगदी खरं सुद्धा आहे. आपण सगळेच कधी ना कधी चुका करतो. पण त्या चुकांमुळे स्वतःला दोष देणं किंवा स्वतःला शिक्षा करणं हे चुकीच आहे ते थांबवायला हवं. स्वतःला माफ करणं ही स्वतःवर प्रेम करण्याची एक मोठी पायरी आहे.
भूतकाळातल्या चुकांबद्दल स्वतःला दोष देणं बंद करा. त्याऐवजी त्या चुकांमधून काय शिकायला मिळालं यावर लक्ष केंद्रित करा आणि भूतकाळ राहणे सोडून द्या व वर्तमान वर ध्यान केंद्रित करा. स्वतःला एक पत्र लिहा, ज्यात तुम्ही स्वतःला माफ करत आहात असं सांगा.
उदाहरणार्थ, “मी तुझ्या चुकांसाठी तुला माफ करतो, आणि आता पुढे जायचं आहे.”मी तर असं अनेकदा केल आहे.”मी माणूस आहे, आणि माझ्याकडून चुका होऊ शकतात” असं स्वतःला सांगा.स्वतःला माफ केल्याने तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल आणि तुम्ही स्वतःला अधिक प्रेम करू शकाल.
5. लबाड किंवा नकारात्मक मित्रांपासून दूर रहा.
मित्रांनो, तुम्ही कधी असा अनुभव घेतलाय आहे का,काही लोकांसोबत बोलून झालं की मन खूप खचलेलं वाटतं?
किंवा असं वाटतं की ते कायम तुम्हीच चुकीचे आहात? असं ठरवतात. तर माझ्यासोबत हे खूप वेळा घडलं. काही “मित्र” होते जे सतत मला खाली पाहायचे.“तुझं काही होणार नाही”, “तू खूप sensitive आहेस”, “एवढं सीरियस का होतोस?”अशा लोकांपासून मी हळूहळू अंतर ठेवायला शिकलो.कारण, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःच्या मानसिक शांततेचं संरक्षण करणं होय.
जे लोक तुमचा आत्मविश्वास खाल्ल्यागत वागतात,ते तुमचे मित्र नाहीत. तर ते एक mental burden आहेत.जेव्हा मी माझ्या social circle मधून अशा नकारात्मक लोकांना बाजूला केलं,तेव्हा मी माझ्या आवाजाला ऐकू लागलो.
मी शांत झालो. मी स्वतःच्या strengths आणि feelings ला मान द्यायला लागलो.म्हणूनच तुमचं आयुष्य हे एखाद्या बागेसारखं आहे.जिथे गरज असेल तिथं पाणी घाला… पण जिथे फक्त काटेच आहेत, तिथे फक्त अंतर ठेवा.
6. स्वतःला छोट्या गोष्टींनी बक्षीस द्या
स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वतःला छोट्या-छोट्या गोष्टींसाठी कौतुक करणं आणि बक्षीस देणं सुद्धा आहे. यामुळे तुम्हाला तुमच्या यशाचा आनंद घेता येतो. एखादं काम पूर्ण केलं, तर स्वतःला आवडेल ते चॉकलेट किंवा कॉफी घ्या आणि स्वतःला छोटे छोटे बक्षीस द्या. कधीतरी स्वतःसाठी एखादी छोटी भेट घ्या.
मग ती नवीन पुस्तक असो किंवा कपडे.महिन्यातून एकदा तरी बाहेर फिरायला जा, नवीन लोकांसोबत वेळ घालवा ,त्यांच्याशी मैत्री करा. कारण याने तुमचं मन अगदी शांत होते. या छोट्या गोष्टी तुम्हाला स्वतःबद्दल चांगलं वाटायला मदत करतील आणि तुमचा मूड उंचावतील.
7. स्वतःच्या भावनांना स्वीकारा
मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या भावनांना स्वीकारणे. आपल्या भावनांना दुर्लक्ष करू नका. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे तुमच्या सर्व भावनांना स्वीकारणं आहे. मग त्या आनंदाच्या असोत, दुखाच्या असोत किंवा रागाच्या असो. आपल्या भावनांना दडपण्याऐवजी त्यांना व्यक्त करणं खूप महत्त्वाचं आहे.
तुम्हाला रडायची इच्छा होत असेल, तर रडा. राग येत असेल, तर तो सुरक्षितपणे व्यक्त करा, उदाहरणार्थ, डायरीत लिहून.जर तुम्हाला तुमच्या भावनांबद्दल बोलायचं असेल, तर एखाद्या विश्वासू व्यक्तीशी किंवा थेरपिस्टशी बोला.माइंडफुलनेस तंत्रांचा वापर करा. यात तुम्ही तुमच्या भावनांचं निरीक्षण करता, पण त्यांचा तुमच्यावर ताबा होऊ देत नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांना स्वीकारता, तेव्हा तुम्ही स्वतःला अधिक समजून घेता आणि स्वतःवर प्रेम करणं सोपं होते.
8. सीमा निश्चित करा
स्वतःवर प्रेम करणं म्हणजे तुमच्या गरजा आणि मर्यादा यांना प्राधान्य देणं. जर तुम्ही नेहमी इतरांसाठी ‘हो’ म्हणत असाल आणि स्वतःसाठी ‘नाही’, तर तुम्ही स्वतःला कमी लेखत आहात. ‘नाही’ म्हणायला शिका ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात किंवा तुमच्या मूल्यांविरुद्ध आहेत, त्यांना स्पष्टपणे ‘नाही’ म्हणा.
तुमच्या वेळेचं नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला स्वतःसाठीही वेळ मिळेल. विषारी नात्यांपासून दूर राहा,जे लोक तुमचा आदर करत नाहीत किंवा तुम्हाला नकारात्मक वाटतं, अशा लोकांपासून अंतर ठेवा.जेव्हा तुम्ही तुमच्या सीमा निश्चित करता, तेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता, आणि यामुळे तुमचा आत्मसन्मान वाढतो.
9. स्वतःची तुलना इतरांशी करू नका
सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात आपण सतत इतरांशी स्वतःची तुलना करत असतो. इतरांचे यशस्वी करिअर, त्यांचे सुंदर घर किंवा आनंदी कुटुंब पाहून आपल्याला स्वतःचे जीवन अपुरे वाटू लागते. पण, ही तुलना तुमच्या आत्मविश्वासासाठी घातक आहे.
प्रत्येकजण वेगळा आहे हे समजून घ्या. प्रत्येकाचा प्रवास, परिस्थिती आणि क्षमता वेगळ्या असतात. तुमची तुलना फक्त तुमच्या स्वतःच्या भूतकाळातील आवृत्तीशी करा.सोशल मीडियाचा वापर मर्यादित करा,सोशल मीडियावर दिसणारे जीवन नेहमीच वास्तव नसते.
ते केवळ इतरांच्या आयुष्यातील निवडक आणि चमकदार बाजू असतात. तुमच्या स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा,तुम्ही आज काय आहात आणि उद्या काय बनू इच्छिता, यावर लक्ष द्या. इतरांनी काय मिळवले यावर नाही.
निष्कर्ष :
स्वतःवर प्रेम करणं ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी वेळ, मेहनत आणि सातत्य लागतं. वर दिलेले हे 9 उपाय तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात स्वतःवर प्रेम करायला आणि स्वतःची काळजी घ्यायला मदत करतील. हे उपाय सोपे असले, तरी त्यांचा प्रभाव खूप मोठा आहे. स्वतःला प्राधान्य द्या, स्वतःला माफ करा, आणि स्वतःच्या प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकाल, तेव्हा तुम्ही इतरांवरही अधिक चांगल्या प्रकारे प्रेम करू शकाल.
तुमचं आयुष्य कितीही कठीण वाटत असेल, पण तुम्ही खूप Strong आहात.स्वतःवर प्रेम करणं म्हणजे मोठ्या गोष्टी करणं नव्हे…तर रोजच्या छोट्या गोष्टीत “माझं पण महत्त्व आहे” हे ओळखणं आहे.
तर मित्रांनो, जर हा लेख वाचताना तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसलं असेल, तर तो शेअर करा, कॉमेंट करा आणि स्वतःवर प्रेम करायला सुरुवात करा,आजपासून, आताच!
डिस्क्लेमर: या लेखातील सर्व माहिती आणि उपाय हे लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांवर आणि संशोधनावर आधारित आहेत. याचा उपयोग वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवर करावा. कोणतीही शारीरिक, मानसिक किंवा वैद्यकीय समस्या असल्यास, कृपया तज्ञांचा सल्ला घ्यावा.
(हे पण वाचा: मोबाइलमुळे लक्ष हरवतंय? अभ्यासात लक्ष मिळवण्यासाठी 7 सोपे टिप्स जाणून घ्या ! )
FAQ :
1. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे नक्की काय?
स्वतःच्या भावना, चुका, गरजा आणि आत्म्याला समजून घेऊन स्वीकारणं होय.
2. स्वतःवर प्रेम करणं आणि स्वार्थी होणं यात फरक आहे का?
हो, प्रेम म्हणजे स्वतःची काळजी घेणं, स्वार्थ म्हणजे फक्त स्वतःचाच विचार करणं.
3. जर मी दररोज स्वतःवर प्रेम करायचं ठरवलं, तर काही बदल दिसतील का?
हो, आत्मविश्वास, मानसिक आरोग्य, आणि शांत decision-making.
4. सुरुवात कुठून करावी?
एक प्रेमळ वाक्य, एक self-care activity, सोशल मीडियावर मर्यादा, आणि गरजेप्रमाणे “नाही” म्हणणं.