अभ्यासात आळस येत असल्यास काय करावे?: अभ्यास करण्याचा प्लॅन करून बसलो, पुस्तक उघडलं आणि दोन पानं वाचल्यावर डोळे जड होऊ लागतात, मेंदू म्हणतो “थोडा ब्रेक घेऊया” आणि नकळत आपल्या मोबाईल हातात येतो! हे दृश्य ओळखीचं वाटतंय ना? अभ्यासा करत असताना आळस येणं हे प्रत्येक विद्यार्थ्याला कधीतरी होतंच. पण प्रश्न असा की हा आळस कमी कसा करायचा आणि अभ्यासाची गाडी रुळावर आणायची कशी?
तर मित्रांनो, या लेखात आपण अगदी सोप्या भाषेत आळसावर मात करण्याचे, लक्ष केंद्रीत ठेवण्याचे आणि अभ्यासात रस निर्माण करण्याचे मार्ग जाणून घेणार आहोत.
मी कॉलेजमध्ये थर्मोडायनामिक्सचा अभ्यास करताना दोन पानांतच तो अवघड वाटला. ‘फक्त ५ मिनिटं’ YouTube पाहायचं ठरवलं, पण तासभर वाया गेला. तेव्हा कळलं कि, आळस हा शरीराचा नाही, तर मेंदूचा खेळ आहे.
1. आपल्या आळसाचं कारण शोधा
अभ्यासात आळस येतोय, म्हणजे तुमचं मन काहीतरी सांगतंय. तो फक्त “आज अभ्यास करायची इच्छा नाही” एवढाच मुद्दा नसतो. त्यामागे काही लपलेली कारणं असतात, जी आधी समजून घेणं गरजेचं आहे.
झोप कमी मिळणं
तुम्ही रात्री उशिरा मोबाईल वापरून, सिरीज पाहून किंवा गेम खेळून झोपत असाल, तर मेंदूला विश्रांती मिळत नाही.
दुसऱ्या दिवशी अभ्यासाला बसल्यावर शरीर जड होतं, डोळे उघडे ठेवणं अवघड जातं. झोप हा मेंदूचा चार्जर आहे. तोच नीट मिळाला नाही, तर अभ्यास सुरू करायची इच्छाच होत नाही.
मोबाईल / सोशल मीडियाचा अति वापर
Instagram, YouTube, Reels हे सगळं तुमच्या मेंदूला तात्पुरता आनंद देतं, मोबाइलमुळे लक्ष हरवतं. पण अभ्यासाच्या वेळी लक्ष विचलित करतं. आपल्या मेंदूला मोबाइल मधील सतत जलद, रंगीबेरंगी कंटेंट पाहण्याची सवय झालेली असल्याने पुस्तकातील काळे-पांढरे शब्द त्याला बोअर वाटतात. म्हणूनच अभ्यास करताना मोबाईल लांब ठेवणं ही पहिली गरज आहे.
पुस्तकं कंटाळवाणी वाटणं
सगळे विषय आपल्या आवडीचे असतीलच असं नाही. काही विषय अवघड वाटतात. जेव्हा आपल्याला एखाद्या विषयात रस वाटत नाही, तेव्हा मेंदू त्या गोष्टीकडं दुर्लक्ष करतो. यावर उपाय म्हणजे अभ्यास करण्याची पद्धत बदलणं डायग्राम्स, व्हिडिओ लेक्चर्स किंवा ग्रुप डिस्कशनचा वापर करा.
हे पण वाचा: परीक्षेआधी अभ्यास करण्याची योग्य पद्धत
अनियमित दिनचर्या
अभ्यासाची वेळ कधी सकाळी, कधी रात्री, कधी दिवसभर नाही… अशा अनियमित दिनचर्येमुळे मेंदूला अभ्यासाची सवय लागत नाही. मेंदूला सवय लागली की, ठराविक वेळी तो आपोआप “स्टडी मोड” मध्ये जातो. म्हणून वेळ निश्चित ठेवणं हा आळस कमी करण्याचा सोपा मार्ग आहे.
2. लहान उद्दिष्टं ठेवा
मोठं पर्वत चढायचं असेल तर एकेक पाऊल टाका. आपण सगळेच कधी ना कधी हि चूक नक्कीच करतो, “आज मी सलग ८ तास अभ्यास करणार!” असं मोठं टार्गेट ठेवतो, आणि मग पहिल्याच तासाला दमून जातो. कारण आपला मेंदू एकदम मोठा भार पाहून “नको, उद्यापासून सुरू करूया” असा सिग्नल देतो.
त्याऐवजी लहान-लहान उद्दिष्टं ठेवा.
उदाहरणार्थ:
- पुढची २५ मिनिटं फक्त एकच प्रकरण वाचा.
- किंवा “या ब्रेकच्या आधी १० गणिताची उदाहरणं सोडवायची” असं ठरवा.
हा छोटासा बदल मनाला घाबरू देत नाही. Pomodoro Technique ह्याच तत्त्वावर चालते. २५ मिनिटं फोकस्ड अभ्यास + ५ मिनिटं छोटासा ब्रेक. चार अशा सेशन्सनंतर १५-२० मिनिटांचा मोठा ब्रेक घ्या.
मी कॉलेजच्या exam च्या आधी ही technique वापरली होती. आधी मी ३-४ तास continuous अभ्यास करण्याचा प्रयत्न करत होतो, पण तोटाच होत होता. कारण मधेच मोबाईल हाती, YouTube आणि Instagram वर रील्स स्क्रोल सुरू करत होतो.
Pomodoro वापरल्यावर मात्र मेंदूला कळलं की “फक्त २५ मिनिटं” आहे. त्यामुळे प्रेशर नाही, पण फोकस वाढला.
आणि ब्रेकमध्ये थोडं पाणी प्यायचं, २ मिनिटं चालायचं, आणि पुन्हा ताजेतवाने होऊन बसायचं.
3. वातावरण बदला
वातावरण बदलून अभ्यासासाठी मूड तयार करा. तुमच्या अभ्यासाचं ठिकाण म्हणजे तुमच्या मेंदूचं workspace आहे.
जर तुम्ही गोंगाटात, अव्यवस्थित टेबलावर किंवा जास्त आरामदायक बेडवर अभ्यास करत असाल तर आळस हा हमखास येणारच.
कारण वातावरणाचा मेंदूवर थेट परिणाम होतो.
- गोंगाटा मुळे लक्ष विचलित
- अव्यवस्था यामुळे मेंदूला गोंधळ वाटतो
- जास्त आराम केल्यामुळे अभ्यासाऐवजी झोप लागते
त्यामुळे अभ्यासाची जागा स्वच्छ, उजेडाने भरलेली ठेवा. टेबल-खुर्चीवर बसून अभ्यास केल्याने शरीर पण “कामाच्या मोड” मध्ये येतं. मोबाईल डिस्टर्बन्स-फ्री मोडवर ठेवा किंवा दुसऱ्या खोलीत ठेवा. जास्त झालं तर Forest सारखं अॅप वापर, जे फोकस ठेवायला मदत करतं.
एक छोटा ट्रिक वापरुन पहा: जर तुम्हाला अभ्यासात instantly mood आणायचा असेल तर “study trigger” तयार करा.
जसं कि –
- एक specific study playlist
- कॉफीचा हलका सुगंध
- ठराविक टेबलवर बसणं
हे repeat केल्यावर तुमचा मेंदू आपोआप त्या सिग्नलशी अभ्यास जोडेल आणि आळस कमी होईल.
हे पण वाचा: अभ्यासासाठी उत्तम टाइम टेबल कसे बनवावे? वेळेचे नियोजनाचे 8 सोपे टप्पे
4. शरीर हलवा
अभ्यास करताना आपण अनेकदा तासन्तास एकाच जागी बसून राहतो. सुरुवातीला वाटतं “जास्तीत जास्त वेळ बसलो म्हणजे जास्त अभ्यास होईल.” पण खरं काय होतं? शरीर सैल पडतं, रक्ताभिसरण कमी होतं, आणि आळस येतो. मेंदू पण sleep mode मध्ये जातो.
उपाय? – शरीर हलवा. फक्त ५ मिनिटं का असेना,
- खोलीत हळू हळू चालून या.
- हलके स्ट्रेचिंग करा.
- हात-पाय हलवा, मान फिरवा.
हे केल्याने रक्ताभिसरण सुधारतं, डोळ्यांचा ताण कमी होतो, आणि मेंदू पुन्हा alert मोडमध्ये येतो.
मी exam च्या आधी सकाळी ३-४ तास सतत अभ्यास करायचो. मग मी लक्षात घेतलं की पहिल्या दीड तासानंतर लक्षच लागत नाही. मग मी ठरवलं कि, प्रत्येक ३०-४० मिनिटांनी २ मिनिटं उभं राहायचं, खिडकीतून बाहेर बघायचं, हात-पाय ताणायचे. याचा परिणाम म्हणजे, थकवा कमी लागतो आणि लक्ष जास्त अभ्यासात केंद्रित होते.
लक्षात ठेवा: चालणं आणि हलकी हालचाल हे आपल्या मेंदूसाठी “refresh” बटण आहे.
5. अभ्यासाची पद्धत बदला
कधी कधी आळस हा अभ्यासाच्या कंटाळवाण्या पद्धतीमुळे येतो. संपूर्ण दिवस फक्त पुस्तक वाचत बसणं म्हणजे मेंदूला झोप आणणं होय.
त्याऐवजी पद्धत बदला:
- वाचून न घेता लिहून काढा: जेव्हा आपण हाताने लिहितो, तेव्हा मेंदू दुप्पट लक्ष देतो आणि आठवण जास्त काळ टिकते.
- Mind Maps आणि Diagrams वापरा: आपल्या मेंदूला visuals आवडतात. एका पानावर रंगीत आकृती काढली तर ती exam ला पटकन आठवते.
- ग्रुप स्टडी: योग्य मित्रांसोबत अभ्यास केल्याने विषयावर चर्चा होते, एकमेकांना प्रश्न विचारता येतात, आणि मजा पण येते.
तुम्हाला आवडणारी learning method शोधा. उदा. मला science diagrams रंगवणं आवडतं, त्यामुळे मी पूर्ण chapter notes चित्रांसारखं काढतो. कोणी audio notes ऐकून शिकतो, कोणी flashcards वापरतो. जसं जेवणात variety असेल तर भूक लागते, तसंच अभ्यासात variety असेल तर उत्साह येतो.
6. स्वतःला बक्षीस द्या
मानवी मेंदूला Reward System फार आवडतो. जसं लहानपणी गृहपाठ पूर्ण केल्यावर आई चॉकलेट द्यायची, तसं मोठं झाल्यावरही आपला मेंदू बक्षीस मिळाल्यावरच उत्साहाने काम करतो.
कसं करायचं?
- ठरवा कि “हा chapter पूर्ण झाला की मी माझं आवडतं गाणं ऐकणार”
- एखादा कठीण विषय संपवला की छोटा स्नॅक खा.
- २५ मिनिटं पूर्ण लक्षपूर्वक अभ्यास केल्यावर ५ मिनिटं मोबाईल स्क्रोल करा.
मी पण exam च्या वेळी “reward jar” ठेवलं होतं. chapter संपला की त्यात एक छोटी चॉकलेट ठेवायची, आणि आठवड्याच्या शेवटी सगळ्या चॉकलेट्सचा आनंद घ्यायचा. असं केल्यावर अभ्यास गेमसारखा वाटतो आणि आळस पळून जातो.
7. पुरेशी झोप
आळसाचा नंबर वन इलाज म्हणजे पुरेशी झोप घेणे होय. लोक समजतात की जास्त अभ्यास म्हणजे कमी झोप घेणे.
पण उलटं होतं, कमी झोप म्हणजे जास्त आळस, कमी लक्ष, आणि डोकं जड पडते.
झोप सुधारण्यासाठी:
- रोज ७-८ तास झोप घ्या.
- झोपण्याच्या आधी ३०-४५ मिनिटं मोबाईल, TV टाळा.
- झोपायची आणि उठायची वेळ ठरवा, आठवड्याच्या शेवटीसुद्धा.
वैज्ञानिक तथ्य: झोपताना मेंदू आपण दिवसभरात जे काही शिकलं ते व्यवस्थित organize करतो, short term memory ला long term मध्ये convert करतो. त्यामुळे कमी झोप म्हणजेच विसरभोळेपणा होय.
हे पण वाचा: स्मरणशक्ती वाढवण्यासाठी 5 सोपे घरगुती उपाय
8. मेंदूला ‘स्टडी मोड’ मध्ये आणा
अभ्यास सुरू करताच मेंदू लगेच फोकस करेल असं होत नाही. त्याला warm-up लागतो, जसं खेळाडूला match आधी warm-up करावा लागतो.
स्टडी मोडसाठी :
- टेबलवर बसून २-३ मिनिटं डोळे मिटून Deep Breathing करा.
- मनात अभ्यासाचं स्पष्ट उद्दिष्ट आणा – “माझं टार्गेट ९०% आहे”
- १-२ positive quotes मनात म्हणा – “मी हे नक्की करू शकतो.”
तुम्ही हे एक ट्रिक वापरू शकता, अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी रोज एकच गाणं ऐका. मेंदू त्या गाण्याला अभ्यासाशी जोडेल आणि ते ऐकताच तुमचं focus mode ON सुरू होईल.
9. चांगला आहार
जड, तेलकट, आणि तुपकट जेवण केल्यावर मेंदूचा reaction असं असते कि, “मला झोप येतेय, अभ्यास नंतर करुया.”
त्याऐवजी:
- हलका, पौष्टिक आहार घ्या – डाळ-भात, भाज्या, रोटी.
- फळं, सुकामेवा, पाणी यांचा पुरेपूर वापर करा.
- ग्रीन टी, लिंबूपाणी घ्या,यामुळे ऊर्जा वाढते आणि डोकं हलकं राहते.
अभ्यास करताना बाजूला पाण्याची बाटली ठेवा. शरीरात १-२% पाणी कमी झालं तरी concentration कमी होतं.
10. स्वतःला प्रेरित ठेवा
उत्साह संपला की अभ्यास सुद्धा संपतो. त्यामुळे स्वतःला रोज मोटिवेट करणं गरजेचं.
प्रेरणा मिळवण्यासाठी:
- टॉपर मुलाखती वाचा – त्यांच्या स्ट्रॅटेजी नोट करा.
- मोटिवेशनल व्हिडिओ किंवा पॉडकास्ट ऐका.
- स्टडी टेबलवर तुमच्या ध्येयाचं फोटो किंवा quote लावा.
- तुमच्या मार्कशीटचं फोटो future vision म्हणून ठेवा.
मी एक “Dream Wall” बनवली. माझ्या ध्येयाचं फोटो, कोट्स, आणि माझं नाव असलेली टॉपर लिस्ट. रोज सकाळी बघून उर्जा दुप्पट होते.
मित्रांनो, जे काम करायचं आहे ते लगेच करा. “नंतर करतो” असं मनात आलं, की ताबडतोब सुरू करा. कारण नंतर म्हणजे कधीच नाही.
निष्कर्ष:
बघा, आळस हा कुठल्याही विद्यार्थ्याचा ‘शत्रू नंबर वन’ आहे, पण त्याला हरवायचं काम कुणी दुसरं करणार नाही. ते तुम्हालाच करावं लागेल. थोडी शिस्त, छोट्या छोट्या सवयी, आणि स्वतःला समजून घेणं. एवढंच पुरेसं आहे.
आजपासून मोठ्या टार्गेट्सचा दबाव न घेता, लहान लहान पाऊल उचला. योग्य झोप, पौष्टिक आहार, स्वच्छ वातावरण, आणि ‘आता लगेच’ नियम पाळा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा.
आळस काही सेकंदांचाच असतो, पण त्याला हरवल्यावर मिळणारं समाधान आणि प्रगती ती मात्र आयुष्यभर साथ देते.
बाकी, तुमचा आळस हरवण्यासाठी तुम्ही कोणता उपाय वापरता? कमेंटमध्ये नक्की सांगा!
Disclaimer: हा लेख केवळ शैक्षणिक व माहितीच्या उद्देशाने लिहिलेला आहे. वैयक्तिक किंवा आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा.
FAQ:
1. अभ्यासात आळस येतो, सुरुवात कशी करू?
सुरुवात लहान टास्कने सुरुवात करा, २५ मिनिटं सतत अभ्यास करा आणि मग ब्रेक घ्या.
2. मोबाईलमुळे लक्ष विचलित होतं, काय करावं?
मोबाईल सायलेंट मोडवर ठेवून दुसऱ्या खोलीत ठेवा किंवा अॅप ब्लॉकर वापरा.
3. रात्री अभ्यास करणं चांगलं की सकाळी?
तुमच्या ऊर्जा पातळीवर अवलंबून आहे. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. पण सकाळी मेंदू ताजातवाना असतो.
हे पण वाचा: दिवसाची सुरुवात चांगल्या विचारांनी का करावी?
