झोपेतून उठल्यावर लगेच मोबाईल का पाहू नये ?

झोपेतून उठल्यावर लगेच मोबाईल का पाहू नये ?: तुम्ही कधी लक्ष दिलंय का? आपल्या सगळ्यांचा दिवस कसा सुरू होतो? डोळे पूर्णपणे उघडायच्या आधीच हात आपोआप फोनकडे जातो.

“काय मेसेज आलेत?”, “WhatsApp” कोणाचं नवीन स्टेटस आलंय का?”, “Instagram वर काय चाललंय?”, “कालच्या पोस्टला किती लाईक्स आले?” असं करत करत आपण दिवसाची सुरुवात त्या चमचमणाऱ्या त्या मोबाईलच्या स्क्रीनने करतो.

पण कधी विचार केला का, हा सकळचा क्षण जो तुमच्या दिवसाचा सगळ्यात शांत आणि शुद्ध क्षण असतो आणि तो आपण एका स्क्रीनच्या उजेडात गमावतो!

रात्रभर शरीर आणि मेंदू विश्रांती घेत असतात. तुमचा मेंदू म्हणजे जणू काही “रीसेट” झालेला संगणक आहे. जो सकाळी नवा दिवस सुरू करण्यासाठी तयार असतो. नवे विचार घ्यायला. पण आपण त्याला शांततेत दिवसाची सुरुवात करू देत नाही.

उठल्या उठल्या जेव्हा आपण फोन उचलतो, तेव्हा आपल्या मेंदूवर शेकडो गोष्टींचा भार एकदम पडतो,नोटिफिकेशन्स, ईमेल्स, मेसेजेस, न्यूज, रील्स, फोटो… हे सगळं पाहून मेंदू अजून जागा व्हायच्या आधीच थकतो. आणि त्यानंतर दिवसभर मन बेचैन, लक्ष विचलित आणि विचार विस्कळीत राहतात.

हे असं वाटतं की, आपण उठलो, पण प्रत्यक्षात आपला मेंदू अजून झोपेतच आहे, आणि आपण त्याला “सकाळचं शांत सूर्योदय” न दाखवता थेट “डिजिटल जगाचं गोंगाट” दाखवतो.

मग आश्चर्य कसचं, की दिवस सुरू होतानाच आपल्याला थकवा जाणवतो, डोकं जड वाटतं, आणि मन कुठेच स्थिर राहत नाही.

पण थांबा, तुम्ही आता काळजी करू नका,आता तुम्ही विचार करत असाल कि “बरं, हे सगळं समजलं, पण मग उपाय काय?”

चला तर मग आज आपण अगदी साध्या, सोप्या भाषेत यावर उपाय पाहूया.

सकाळ म्हणजे नवीन सुरुवात

सकाळ म्हणजे आपली अगदी नवीन सुरुवात असते. पण फोन घेतल्यावर सगळं बिघडुन जाते. सकाळ म्हणजे आपल्या शरीराचं “रीसेट बटन” असतं. रात्रभर मेंदू विश्रांती घेतो, विचार स्वच्छ होतात, आणि सकाळी उठल्यावर शरीर नव्या उर्जेने तयार होतं.

पण काय होतं जेव्हा तुम्ही उठल्यावर लगेच फोन उचलता? तेंव्हा तुमचा मेंदू अजून आराम मोड मध्ये असतो. आणि अचानक तुम्ही तुमच्या मेंदूवर भरपूर माहितीचा बॉम्ब टाकता.

जसं कि, न्यूज, मेसेज, नॉटिफिकेशन्स, स्टेटस, रील्स, पोस्ट्स… हे सगळं आपल्या मेंदूला झटक्यात प्रोसेस करावं लागतं. त्यामुळे मेंदू गोंधळून जातो, आणि दिवसभर चिडचिड, थकवा, आणि लक्ष केंद्रित न होणं असं होते.

हे पण वाचा: रात्री झोपण्याआधी हे 9 नियम पाळा आणि निरोगी झोप घ्या

सकाळचा फोन म्हणजे चिंताग्रस्त दिवसाची सुरुवात

तुम्ही कधी लक्ष दिलंस का, फोन पाहून उठल्यावर कधीच मन शांत वाटत नाही? उलट, कोणीतरी “seen” करून रिप्लाय नाही दिला, किंवा दुसऱ्याचा सुंदर सकाळचं फोटो पाहून तुम्हाला स्वतःचं जीवन बोअर वाटायला लागतं… हा स्ट्रेस नको तिथून सुरू होतो.

मानसशास्त्र सांगतं की, “जेव्हा आपण दिवसाची सुरुवात दुसऱ्यांच्या माहितीने करतो, तेव्हा आपला मेंदू स्वतःचा विचार करायला विसरतो.”

म्हणजेच तुम्ही सकाळी स्वतःचं जीवन बघायच्या आधी दुसऱ्यांचं जीवन बघता, मग हीच तर सर्वात मोठी चूक आहे.

झोपेतून उठल्यावर मेंदू कसा काम करतो?

हे थोडं झोपेच विज्ञान समजून घ्या. रात्री झोपताना मेंदू “थीटा स्टेट” मध्ये जातो. म्हणजे एकदम रिलॅक्स, स्वप्नाळू, शांत अवस्था. सकाळी उठल्यावर तो “अल्फा स्टेट” मध्ये असतो. हा वेळ ध्यान, विचार, आणि नवीन गोष्टींसाठी सर्वोत्तम असतो.

पण जर तुम्ही या वेळे मध्ये हातात फोन घेतल्या, तर मेंदू लगेच “हाय बीटा स्टेट” मध्ये जातो, म्हणजे टेन्शन, घाई, घोळ त्यामुळे तुमचं मन शांत न राहता गोंधळलेलं, बेचैन, आणि विचारांनी भरलेलं होतं.

मग सकाळी उठल्यावर नेमकं काय करायचं?

“फोन पाहू नका” एवढं सांगून थांबणं योग्य नाही ना? मग प्रश्न येतो कि,“ठीक आहे, पण मग उठल्यावर नेमकं काय करायचं?” चला तर मग जाणून घेऊया..

उत्तर अगदी सोपं आहे,फोन उचलण्याआधी फक्त ३० मिनिटं स्वतःसाठी द्या. हो, फक्त अर्धा तास! पण हा अर्धा तास तुम्हाला दिवसभर शांत, ऊर्जावान आणि आनंदी ठेवू शकतो.

चला बघूया त्या 30 मिनिटांत तुम्ही काय करू शकता..

1. दीर्घ श्वास घ्या,दोन मिनिटं फक्त स्वतःशी जोडा

उठल्यावर डोळे उघडा आणि काही सेकंद काहीही करू नका. फोन, सोशल मीडिया, मेसेज हे सगळं विसरा. फक्त शांत बसा आणि खोल श्वास घ्या, हळूवार सोडा. असं केल्याने मेंदूला ऑक्सिजन मिळतो आणि मन स्थिर होतं. ताण कमी होतो आणि तुम्ही दिवसाची सुरुवात शांततेने करता, गोंधळाने नाही.

हवं तर “आजचा दिवस सुंदर जाईल” असं मनात म्हणा. हे एक वाक्य तुमच्या दिवसभरात सकारात्मक ऊर्जा आणू शकतं!

हे पण वाचा: Overthinking थांबवण्यासाठी 7 जबरदस्त ट्रिक्स

2. पाण्याचा एक ग्लास प्या

कोमट पाणी म्हणजे जणू सकाळचं औषधच आहे. रात्रभर शरीर विश्रांती घेत असतं आणि आत विषारी द्रव्यं (toxins) साचतात. उठल्यावर लगेच एक ग्लास कोमट पाणी पिल्याने ते बाहेर पडतात. तुमचं पचन सुधारतं, त्वचा चमकदार होते, आणि शरीरात ताजेपणा येतो.

जर शक्य असेल तर त्या पाण्यात थोडं लिंबू किंवा मध टाका, फायदा दुप्पट होईल! शरीर “डिटॉक्स” होतं आणि मेंदू जागा होतो.

3. एक चांगली गोष्ट, सुविचार किंवा प्रेरणादायी वाक्य वाचा

सकाळचं पहिलं विचार म्हणजे आपल्या शरीराचा “टोन सेटिंग” असतो. तो विचारच ठरवतो की तुमचा दिवस कसा जाणार आहे.

म्हणून एखादी छोटी प्रेरणादायी गोष्ट वाचा,किंवा एखादा सुविचार जसं की: “आज मी माझं सर्वोत्तम देणार!”
“माझं मन शांत आहे, मी सक्षम आहे.”

ही छोटी वाक्यं मनात बळ देतात. सकाळी मेंदू जास्त ग्रहणशील असतो, त्यामुळे त्या विचारांचा परिणाम दिवसभर जाणवतो.

4. कृतज्ञता व्यक्त करा

डोळे बंद करा आणि मनात म्हणा, “धन्यवाद, मला आणखी एक सुंदर दिवस मिळाला.”

असं म्हणताना तुम्हाला जाणवेल की आयुष्यात किती गोष्टींसाठी आपण आभारी राहू शकतो. घर, कुटुंब, आरोग्य, आणि आपण स्वतः! ही कृतज्ञतेची भावना तुमचं मन हलकं करतं आणि नकारात्मक विचार दूर ठेवते.

हे पण वाचा: मोबाईलवरचा वेळ कमी करून Productive कसं व्हायचं?

5. हलकी हालचाल करा

सकाळी काही मिनिटं हलका व्यायाम, स्ट्रेचिंग किंवा चालायला जा . अगदी ५ ते १० मिनिटंसुद्धा पुरेशी असतात.
रक्तप्रवाह वाढतो, स्नायूंना ऑक्सिजन मिळतो आणि मेंदू जागा होतो.

हे केल्यावर तुम्ही फक्त शरीरानं नव्हे, तर मनानंही उठलेले वाटाल.

हे सगळं केल्यावरच फोन हातात घ्या!

तेव्हा बघा फोन पाहिल्यावरही ताण येणार नाही, कारण तुम्ही आधीच स्वतःला स्थिर, शांत आणि सकारात्मक बनवलंय.

सकाळी स्वतःसाठी घेतलेली ही ३० मिनिटं तुमच्या दिवसभरात किती फरक घडवतात हे तुम्हाला काही दिवसांतच जाणवेल.

लक्षात ठेवा,“सकाळी उठल्यावर फोन पाहणं म्हणजे स्वतःचा वेळ इतरांना दान करणं होय!” पण “फोन उचलण्याआधी स्वतःशी बोलणं म्हणजे स्वतःच्या जीवनात गुंतवणूक करणं होय!”

फोन वापरायचा पण शहाणपणाने!

फोन वाईट नाहीये, पण वेळेचं भान असायला हवं.

  • सकाळी उठल्यावर ३० मिनिटं “नो फोन झोन” ठेवा.
  • रात्री झोपायच्या आधीही फोन दूर ठेवा.
  • सकाळी पहिल्यांदा स्वतःकडे लक्ष द्या, मग जगाकडे बघा!

हे केलात तर तुम्हाला फरक जाणवेल. जास्त ऊर्जा, कमी टेन्शन, आणि दिवसभर लक्ष केंद्रित राहील.खूप लोक म्हणतात… “फोन न घेतल्याशिवाय मला झोपच मोडत नाही!”

हो, सवय आहे ती! पण लक्षात ठेवा सवयी बदलतात. आधी एक दिवस करून बघा, मग तीन दिवस, मग आठवडा…
थोडं थोडं करून फोनपासून सकाळचा “गॅप” वाढवा .

छोटा प्रयोग करून बघा..

उद्या सकाळपासून ७ दिवसांसाठी हे करून बघा :

सकाळी उठल्यावर पहिले ३० मिनिटं फोन नाही.
त्याऐवजी:

  • एक ग्लास कोमट पाणी प्या
  • ५ मिनिटं खोल श्वास
  • ५ मिनिटं विचार लिहून ठेव (journal)
  • नंतर हलका व्यायाम किंवा सूर्य नमस्कार

फक्त ७ दिवस हे करा.. ७ दिवसांनंतरच तुमचं मन म्हणेल कि, “हीच तर खरी फ्रेश सुरुवात आहे!.”

निष्कर्ष :

सकाळी उठल्यावर फोन पाहणं म्हणजे…तुमच्या दिवसावर नियंत्रण दुसऱ्यांच्या हातात देणं आहे. फोन थोड्या वेळाने बघा, पण त्या आधी स्वतःकडे बघा. हसा, श्वास घ्या, आणि नव्या दिवसाचं स्वागत करा!

“सकाळी उठल्यावर फोन हातात न घेणे म्हणजे स्वतःशी भेटीचा वेळ मिळतो.” तो वेळ तुला दिवसभर ऊर्जावान, आनंदी आणि शांत ठेवतो! मंडळी तुम्हाला हा लेख कसा वाटला ते कमेन्ट मध्ये नक्कीच सांगा.

हे पण वाचा: दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्यासाठी काय खावे?

WhatsApp Group Join Now
Instagram Group Join Now
Sharing Is Caring:

मी कोण आहे?तर मी गेल्या काही वर्षापासून स्वतःवर काम करत आहे.स्व-उन्नती(Self Improvement), सकारात्मक विचार, वेळेचं व्यवस्थापन, यशस्वी सवयी आणि शांत मन या गोष्टी मी स्वतः अनुभवून शिकल्या आहेत. या प्रवासात जे काही मला उपयोगी वाटलं, जे खरंच तुमच आयुष्य बदलेल. तेच मी इथं लिहतो.माझं एकच उद्दिष्ट आहे कि, "सोप्या शब्दात प्रेरणा देणं आणि लोकांच्या आयुष्यात छोटा का होईना, पण सकारात्मक बदल घडवणं." माझे लेख अनुभव, अभ्यास आणि रोजच्या जीवनात वापरता येतील अशा सवयींवर आधारित असतात. माझा विश्वास आहे कि,प्रत्येक दिवस हा तुमचं आयुष्य बदलण्याची एक संधी असतो.

Leave a Comment

Verified by MonsterInsights